

Jaysingpur Electrocution Death
जयसिंगपूर : येथील ८ व्या गल्लीतील बाळूमामा चौक राजीवगांधी नगर येथे घराचे तिसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू असताना शेजारून गेलेल्या एमएसईबीच्या इलेक्ट्रिक तारांना बांधकामची सळी लागून बसलेल्या विजेच्या धक्क्यात सेंट्रींग कामगार सुरज सत्यप्रताप राऊत (वय ३५) याचा जागीच मृत्यू झाल्याचे घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, कोळेकर यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्याचे काम सुरू होते. या ठिकाणी सेंट्रींग कामगार काम करीत होते. सायंकाळी सहाच्या दरम्यान तिसऱ्या मजल्यावर ती बांधकामसाठी लागणारी साळी वरती घेत असताना शेजारून गेलेल्या इलेक्ट्रिक सिटीच्या वायरीना लोखंडी सळींचा स्पर्श झाला. त्यामुळे दोन कामगारांना जोराचा विजेचा धक्का लागला. यातील सुरज राऊत हा जागीच ठार झाला तर एक कामगार बाजूला पडल्यामुळे जखमी झाला.
घटना समजतात परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम यांनी भेट देऊन पंचनामा केला. तर विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. सुरज हा कर्नाटक राज्यातील असून जयसिंगपूर येथील गल्ली नंबर ६ मध्ये जयसिंगपूर येथे भाड्याने राहत होते. याच्या मागे पत्नी, दोन मुले असा त्यांचा परिवार आहे.