शाळकरी मुलांनी केलेली वेशभुषा Pudhari Photo
कोल्हापूर

कसबा तारळेच्या न्यू हायस्कूलमध्ये दसरा महोत्सव उत्साहात!

पुढारी वृत्तसेवा

गुडाळ : आशिष पाटील

माध्यमिक शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील न्यू हायस्कूलच्या मुला - मुलींनी विविध कलाविष्कारांचे सादरीकरण करून शाळेतील दसरा महोत्सवाची रंगत वाढविली. या महोत्सवामध्ये विविध रंगी बेरंगी व पारंपारिक पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांची गावातून शोभायात्रा काढली.यामधील इयत्ता ६ वी चा विद्यार्थी आरव कांबळे याने साकारलेले कर्नाटकातील कांतारा आदिवासी देवतेचे रूप ग्रामस्थांच्या नजरेत लक्षवेधी ठरले.

यावेळी कंथेवाडीचे माजी सरपंच व कोजिमाशि पतपेढीचे माजी संचालक एस.बी.पाटील यांनी मुलांना कोल्हापुरी फेटे बांधण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.त्यांच्याकडून फेटे बांधण्याचे शिक्षण घेण्यासाठी मुलांची एकच झुंबड उडाली. यावेळी भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार अर्पण करतानाचा सजीव देखावाही सादर करण्यात आला.भवानी मातेच्या त्रिशुलावरून कन्या वाचवाचा संदेश देण्यात आला होता.शिवाजी महाराज की जयच्या घोषणेने सारा परिसर दणाणून गेला.यावेळी मुलींनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत महा हादग्यामध्ये दुर्गा मातेची गाणी आळविली.शेवटी मुला मुलींनी गाण्याच्या ठेक्यावर रास दांडीयाचा फेर धरला.

स्वागत एस.आर.जमाल व प्रास्ताविक मुख्याध्यापक ए.एम.पाटील यांनी केले. एस.बी.पाटील व राजू कुलकर्णी यांचा सत्कार मुख्याध्यापक ए .एम.पाटील यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमास संस्था सचिव प्रशांत पाटील, एम.बी.पाटील, ए.एस.पाटील, एम.डी. मांगोरे, एस.एम.रामसिंग, एस.बी.पोवार, ,सौ.वैष्णवी पाटील, आरती पाटील, कु.पी.आर.भोगटे,एन.डी.पाटील,एस.आर.गोरे एस.पी. डवरी, ओमकार कांबळे आदी उपस्थित होते.एम. डी. मांगोरे यांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT