Top-Kasarwadi Road Issue
कासारवाडी : येथे पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने नाले काढताना सार्वजनिक बांधकाम विभाग Pudhari Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : जोतिबा राज्यमार्गावरील पाण्याचा निचरा

पुढारी वृत्तसेवा

कासरवाडी, पुढारी वृत्तसेवा : अनेक वर्षे वादात सापडलेला टोप-कासरवाडी फाट्यावरील नाले अखेर बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात काढले आहेत. यामुळे राज्य मार्गावर येणाऱ्या पाण्याचा निचरा होऊ लागला आहे.

मागील अनेक वर्षापासून कासारवाडी फाटा येथे राज्य मार्गावर दोन्ही बाजूचे नाले मुजल्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबत होते. यामुळे शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि वाहनचालकांना अनेक वर्षापासून त्रास सहन करावा लागत होता. याबरोबरच अनेकांच्या गाड्या पाण्यात बंद पडत होत्या. मुसळधार पाऊस सुरू झाल्यापासून या फाट्यावर सुमारे दोन फूट पाणी नेहमीच वाहत होते. याबाबत अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकांनी लेखी आणि तोंडी तक्रारी दिल्या आहेत. या पार्श्वभुमीवर कासारवाडीचे सरपंच अच्युत खोत यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिवाजी पुलावरील वाहतूक बंद झाल्याने दोन दिवसापासून या मार्गाने वाहतूक सुरु झाली होती. यावेळी येथे अनेकांच्या गाड्या बंद पडून वाहतूक ठप्प होत होती.

प्रसारमाध्यमांनी याबाबतीत अनेक वेळा वृत्तांकन केले. अखेर शुक्रवारी (दि.26) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता महेश कांजर, शाखा अभियंता वैभव जाधव यांच्या आदेशाने स्थापत्य अभियंता एस. डी निंबाळकर यांनी पोलीस बंदोबस्तात येथील जेसीबीच्या साह्याने नाले काढण्यात सुरुवात केली आहे.

SCROLL FOR NEXT