file photo
कोल्हापूर

Dozens of protests in a day|दिवसांत डझनभर मोर्चे-आंदोलने

dozens of protests in a day | दिवसांत डझनभर मोर्चे-आंदोलने

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : डेस्क

पुढील आठ दिवसांत म्हणजेच २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष, विद्यार्थ्यांची तब्बल डझनभर आंदोलने होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने २८ सप्टेंबर रोजी आदिवासी विद्यार्थी मुंबईत लाँग मार्च काढणार आहेत. याच्या दुसऱ्याच दिवशी २९ सप्टेंबरला मुंबईत मातंग समाजाचा महामोर्चा निघणार आहे. २ ऑक्टोबर गांधी जयंतीला एमपीएससी विद्यार्थी पुण्यात सत्याग्रह करणार आहेत. तर ४ ऑक्टोबर रोजी ठाकरे बंधू संयुक्तपणे जनमोर्चा काढणार आहेत.

२८ सप्टेंबर रोजी राज्यभरातील आदिवासी विद्यार्थी नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढणार आहेत. आश्रमशाळांची स्थिती, आदिवासी विकास विभागातील कारभार आदी विषय ते मांडणार आहेत. याच दिवशी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी हल्लाबोल आंदोलन केले जाईल.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत व नुकसानभरपाई द्यावी, या त्यांच्या मागण्या आहेत. तसेच २८ सप्टेंबरला निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांत महाराष्ट्र प्रदेश २ ऑक्टोबरला पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात एमपीएससीचे विद्यार्थी सत्याग्रह करणार आहेत. याच दिवशी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन प्रस्तावित आहे.

आज नाशिक-मुंबई आदिवासी विद्यार्थ्यांचा लाँग मार्च उद्या मुंबईत निघणार

मातंग समाजाचा महामोर्चा गांधी जयंतीला पुण्यात

एमपीएससी विद्यार्थ्यांचा सत्याग्रह ४ ऑक्टोबरला मुंबईत ठाकरे बंधूंचा जनमोर्चा

४ ऑक्टोबरला मुंबईत ठाकरे बंधूंचा जनमोर्चा असेल. एसआयआर/मतदार यादीच्या मुद्द्यावर हे आंदोलन छेडण्यात आले आहे.

५ ऑक्टोबरला मुंबईत आझाद मैदानावर 'शाळा वाचवा, शिक्षण वाचवा' मंचचे आंदोलन असेल. याच दिवशी मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांच्या लाँग मार्चचा समारोप होणार आहे.

२ ऑक्टोबरला पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात एमपीएससीचे विद्यार्थी सत्याग्रह करणार आहेत. याच दिवशी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन प्रस्तावित आहे.

राज्यातील प्रमुख आंदोलने

२८ सप्टेंबर : राज्यभर शेतकरी हल्लाबोल. नाशिकहून आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबईकडे लाँग मार्च. काँग्रेसची जिल्हानिहाय निदर्शने.

२९ सप्टेंबर : मुंबईतील मातंग समाजाचा महामोर्चा आणि वीज कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे

२ ऑक्टोबर : पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचा सत्याग्रह आणि मुंबईतील प्रस्तावित सीजेपीचे आंदोलन.

४ ऑक्टोबर : मुंबईतील उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांचा संयुक्त जनमोर्चा

५ ऑक्टोबर : आझाद मैदानावरील 'शाळा वाचवा, शिक्षण वाचवा' आंदोलन, तसेच आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबईतील आंदोलनाचा टप्पा मोर्चाची परवानगी, मार्ग, वेळ किंवा स्थळ बदलू शकते)

२९ सप्टेंबर रोजी सकल मातंग समाजातर्फे मुंबईत मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा महामोर्चा काढण्यात येणार आहे. याच दिवशी महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर वीज कर्मचारी संघटना मोर्चा काढणार आहेत.

३० सप्टेंबरला राज्यभर बैंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संपाचा तिसरा दिवस आहे.

१ ऑक्टोबर रोजी इराण प्रश्नासंदर्भात मुंबईतील सीएसएमटी परिसरात वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन केले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT