Knife Attack  Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur Doctor Attacked | मित्रांना विनाकारण अॅडमिट केल्याच्या रागातून डॉक्टरवर चाकू हल्ला : मध्यस्थी करणाऱ्याच्या हातावर वार

कुरुंदवाड येथे हॉस्पिटलमध्ये घुसून झालेल्या या हल्ल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात संताप

पुढारी वृत्तसेवा

Kurundwad Knife Assault on Doctor

कुरुंदवाड : मित्रांना विनाकारण हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचा आरोप करत येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये घुसून एका डॉक्टरवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१६) मध्यरात्री घडली. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून भांडण सोडविण्यास गेलेल्या एका व्यक्तीलाही दुखापत झाली आहे.

डॉ. महेश विलास सुरवसे (वय २६, रा. स्वामी समर्थ कट्टा, कुरुंदवाड; मूळ रा. रांजणी, ता. पंढरपूर) व अविनाश वाले (रा. कुरुंदवाड) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. सुरवसे यांनी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुरवसे हे सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. सोमवारी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास संतोष माळी हा हॉस्पिटलमध्ये आला. त्याने त्याचे मित्र शुभम पाटील व शुभम भाट यांना विनाकारण ऍडमिट केल्याचा आरोप करत गोंधळ घातला व डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. यावेळी डॉ. सुरवसे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता माळी याने चाकूने हल्ला करत त्यांच्या पाठीवर वार केला.

यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या अविनाश वाले यांच्या हातावरही चाकू लागून ते जखमी झाले. हॉस्पिटलमध्ये घुसून झालेल्या या हल्ल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर संघटनांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT