कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पूरस्थितीबाबत झालेल्या आढावा बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे. यावेळी उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी. Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : प्रशासन सज्ज, गरज पडल्यास स्थलांतर

जिल्हाधिकारी अमोल येडगे; पूरस्थितीचा घेतला आढावा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात पूरस्थितीच्या अनुशंगाने जिल्हा प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, गरज पडल्यास नागरिकांचे स्थंलातर केले जाईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात पूरस्थितीबाबत त्यांनी सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेतली. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

  • प्रशासनाच्या सुचनांचे पालन करा

  • आपत्तीजन्य परिस्थिती माहिती द्या

  • बचाव साहित्यांची तपासणी करा

  • गरोदर मातांची योग्य काळजी घ्या

आवश्यकता असेल तरच घराबोहर पडा

जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे आवश्यकता असेल तरच घराबोहर पडा, असे आवाहन करत जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, पर्जनमान्य व बंधार्‍यांची पाणी पातळी, होणारे विसर्ग यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. सर्व शासकीय यात्रणांनी त्यांच्याकडील बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची तपासणी करावी. पाणी पातळी वाढल्यामुळे करवीर, हातकणंगले, इचलकरंजी सह सर्व जिल्ह्यातील गावांमधील लोकांची काळजी घेण्याबाबत नियोजन करा.

गरज पडल्यास नागरिकांचे स्थलांतर

कोयना नदीच्या पाण्यामुळे कृष्णा नदीचीही पाणी पातळी वाढू शकते. सर्व गट विकास अधिकार्‍यांनी आपल्या तालुकांच्या आढावा घेऊन परिस्थितीनुसार नियोजन करावे, ज्या पूरभागात गरोदर माता आहेत त्यांच्यासाठी सुरक्षितस्थळी राहण्याची सोय करावी. गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात दररोज सरासरी 40 मि.मी. तर धरण क्षेत्रामध्ये सरासरी 100 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडत आहे. पर्यायी रस्त्यांची माहिती नागरिकांना दिली जात असून पर्यायी मार्गानी वाहतुक सुरळीत सुरू आहे. पाऊस आणि बंधार्‍यांची पाणी पातळी पाहता, ज्या ठिकाणी पुराचे पाणी जाऊ शकते, अशा ठिकाणी प्रशासनाने भेटी दिल्या आहेत. गरज पडल्यास काही ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर केले जाईल, त्याकरीता निवारा केंद्रांची तयारीही केल्याचे त्यांनी सांगितले.

जबाबदारी स्वीकारून काम करा

जिल्ह्यात निर्माण झालेल्या सर्व परिस्थितीचा विचार करा. या परिस्थितीत तातडीने जबाबदारी स्वीकारून काम करा, अशी सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, मुध्याधिकारी यांना केली.

सहा दिवसांत पंचगंगेत 18 फुटांची वाढ

गेल्या 6 दिवसांमध्ये झालेल्या पाऊसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत 18 फुटांनी वाढ झाली आहे. दि.18 जुलै रोजी 23 फुटांवर असणारी पंचगंगा दि.23 जुलै रोजी 41 फुटांवर गेली असून सध्या ती धोका पातळीकडे जात असल्याचेही यावेळी बैठकी सांगण्यात आले.

व्हॉटस्अ‍ॅप क्र. 9209269995 वर माहिती मिळणार

नागरिकांना पूरस्थितीच्या अनुषंगाने माहिती मिळावी यासाठी प्रशासनाने व्हॉटस्अ‍ॅप क्रमांक सुरू केला आहे. नागरिकांना 9209269995 या क्रमांकावर जिल्ह्यातील नियंत्रण कक्षाची, पर्जन्यमान, बंधार्‍यांची पाणी पातळी इ. माहिती रिअल टाईम मिळणार आहे. याशिवाय नियंत्रण कक्षाचा 1077 हा टोल फ्री नंबर 24 तास सुरू आहे. नागरिकांना माहिती घ्यायची असेल किंवा आपत्ती बाबत माहिती द्यायची असेल तर या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT