सिंधुदुर्गात पूरस्थिती, महामार्ग ठप्प; अनेक घरांमध्ये पाणी शिरले

८ जुलै रोजी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी
Flood conditions in Sindhudurga
सिंधुदुर्गात पूरस्थिती निर्माण झाली आहे.Pudhari News Network

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्याने तीन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. या मुसळधार पर्जन्यवृष्टीचा फटका मुंबई-गोवा हायवेला बसला आहे. कसाल धोकमवाडी येथे संरक्षक भिंतीच्या नजीक डोंगर खचल्यामुळे माती हायवेवर आली असून वाहने चालविणे धोक्याचे झाले आहे. तसेच हायवेवरच असलेल्या ओरोस ख्रिश्चनवाडी येथे महामार्गावर पाणी आले आहे. हायवे रस्त्यानजीक असलेल्या काही घरांमध्ये पाणी शिरले असून शेती पाण्याखाली गेली आहे. तसेच येथील एक-दोन घरे पडली आहेत. परिसरातील कुटुंबांना अन्य ठिकाणी हलविण्यात आले असून ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गनगरी येथील रस्त्यावर पाणी आल्याने वाहनचालकांना वाहने चालवणे कठीण झाले आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गनगरीत ठिक-ठिकाणी ओढे-नाले तुंडूंब भरून वाहत आहेत. दरम्यान मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गावर कसाल ओरोस दरम्यान कसाल धोकमवाडी येथे महामार्ग प्राधिकरणाने बांधलेल्या संरक्षक भिंतीच्या नजीक डोंगर खचला असून मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर येऊन पडली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहने चालविणे धोक्याचे झाले आहे. कसाल मालवण रस्त्यावर सुकळवाड ब्राह्मण देव मंदिर नजीक मळेदमणी नदीला पूर आला असून परिसरातील घरांसह, शेती, दुकाने पाण्याखाली गेली आहेत. मुसळधार पावसाचा फटका अनेक गावांना बसला असून लाखोंची हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात उद्या ८ जुलै रोजी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून आजच्या प्रमाणे उद्याही मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news