Karnasinh Gaikwad  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Politics | शाहूवाडीत काँग्रेसला धक्का: कर्णसिंह गायकवाड जनसुराज्य शक्ती पक्षात करणार प्रवेश

गायकवाड यांच्या पक्षांतरामुळे शाहूवाडी तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

Karnasinh Gaikwad to Join Jan Surajya Shakti Party

बांबवडे : गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्णसिंह गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश सोहळा बुधवारी (दि.२२) वारणानगर येथे होणार आहे.

कर्णसिंह गायकवाड यांनी यापूर्वी काँग्रेसच्या उमेदवारीवर तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. शाहूवाडी तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क असून कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा असल्याचे मानले जाते. आगामी गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाची वाट धरली आहे.

वारणा येथे होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यास जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनय कोरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

गायकवाड यांच्या पक्षांतरामुळे शाहूवाडी तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः आगामी गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या निर्णयामुळे काँग्रेसला धक्का बसल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT