महाविद्यालयीन तरुणीचा भरचौकात विनयभंग, शिवीगाळ. file photo
कोल्हापूर

कोल्हापूर : महाविद्यालयीन तरुणीचा भरचौकात विनयभंग, शिवीगाळ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचा बहाणा करून दुचाकीवरून जाणार्‍या कॉलेज तरुणीला रस्त्यात अडवून शिवीगाळ व विनयभंग करणार्‍या पाच जणांविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून संशयितांना तत्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

  • अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न

  • 5 जणांवर गुन्हा; संशयित मोकाटच

  • महिलांचे शिष्टमंडळ पोलिस अधीक्षकांना भेटणार

संशयितांचा शोध सुरू त्यांना लवकरच अटक करू

राज साखरे, निहाल नवले, रोहित माटुंगे, राहुल मच्छले, शुभम मच्छले (रा. मोतीनगर, राजेंद्रनगर परिसर, कोल्हापूर) अशी गुन्हे दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले.

मिलिटरी कँटिनसमोरील रस्त्यावर तिची गाडी अडवली

संबंधित तरुणी कॉलेजला जात असताना मिलिटरी कँटिनसमोरील रस्त्यावर तिची गाडी अडवून नावाची विचारणा केली. तरुणीने प्रतिकाराचा प्रयत्न करताच संशयितांनी शिवीगाळ केली. तिच्या अंगावर धावून गेले. निहाल नवले याने तरुणीचा हात पकडून अंगाशी झोंबाझोबी केली. तोंडावरचा स्कार्फ काढून टाकण्यासाठी दहशत माजविली. तसेच जोरजोरात ओरडून शिवीगाळ केली. अन्य संशयितांनीही त्यास मदत केली. भरचौकात मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शनिवारी (दि. 10) दुपारी ही खळबळजनक घटना घडली.

संशयितांवर पोलिसांनी कठोर कारवाईची मागणी 

संशयितांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी राजारामपुरी परिसरातील विविध संस्था, संघटनांनी केली आहे. महिला मंडळाचे व्यापक शिष्टमंडळ यासंदर्भात लवकरच पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT