Nashik News | चिकनमध्ये अ‌ळ्या निघाल्याने परत केलं म्हणून ग्राहकाला शिवीगाळ

इंदिरानगर पोलिस ठाण्यात ग्राहकांची तक्रार
Nashik News
चिकनमध्ये अ‌ळ्या निघाल्याने परत केलं म्हणून ग्राहकाला शिवीगाळfile photo
Published on
Updated on

इंदिरानगर : कंपनी आउटलेटमधून विकत घेतलेल्या प्रो-चिकनमध्ये अळ्या निघाल्याने संबंधित ग्राहकाने ते परत आणून दिले असता आउटलेटच्या व्यवस्थापकाने ग्राहकाला दमबाजी करत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित ग्राहकाने इंदिरानगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली असून, पोलिसांनी ती दाखल करून घेतली आहे. प्रो-चिकन तयार करणाऱ्या कंपनीच्या उत्पादनांची अन्न औषध प्रशासन विभागाने तपासणी करण्याची मागणी संबंधित ग्राहकाने केली आहे.

आनंद अॅग्रो कंपनीचे नाशिक शहरासह जिल्हाभर चिकन विक्रीचे आउटलेट आहेत. यापैकी पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या प्रो-चिकन आउटलेटमधून ईश्वर माळी यांनी मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास चिकन घेतले. घरी आणल्यानंतर बंद पिशवीतून चिकन बाहेर काढले असता त्यातून चक्क अळ्या बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ते चिकन दाखविण्यासाठी आउटलेटमध्ये पुन्हा आणले असता येथील कंपनी मॅनेजर जगदीश कापसे यांनी माळी यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करून हाकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार आपल्यासोबत घडल्याचा दावा माळी यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केला आहे. माळी यांनी याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, याप्रकरणी आनंद अॅग्रो कंपनीच्या आउटलेटमधील अन्नपदार्थांची अन्न औषध प्रशासन विभागाने तातडीने तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिस तक्रारीत केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news