पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील अडीच वर्षांमध्ये आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध योजना आणि प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले. लाडकी बहीण योजनेतंर्गत महिला सक्षमीकरणाचे काम केले. १,५०० रुपयांवरुन महिलेने लघू व्यवसाय उभा केला. महिलांसाठी एसटी सवलत, मुलींना मोफत शिक्षण अशा योजना राबवून सक्षम मुख्यमंत्री कसा असावा? याचे उदाहरण एकनाथ शिंदे आहेत, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी 'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024'मध्ये बोलताना सांगितले.
मित्रा माध्यमातून ३,२०० कोटींचा प्रकल्प आणला जातोय. त्यातून कोल्हापूर आणि सांगली महापुरासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. मित्रा संस्था ही नीती आयोगासारखे महाराष्ट्राचे थिंकटँक म्हणून काम करते, असेही ते म्हणाले. (Pudhari News Vikas SUMMIT 2024)
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठीसाठी पाठपुरावा सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून यावर लवकरच तोडगा काढला जाईल. खंडपीठासाठी मुख्यमंत्र्यांचे सरन्यायाधीश यांच्याशी बोलणे सुरु आहे. आम्ही मुलभूत सुविधांसाठी असलेले पैसे केशवराव भोसले नाट्यगृहासाठी वापरणार आहोत. यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी २५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रंकाळा आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २० कोटी निधीमुळे सकारणी लागली. कोल्हापुरात विकासाची गंगा आणण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले.