गटारीमध्ये पडून शौर्य सतीश पुजारी या बालकाचा मृत्यू Pudhari File Photo
कोल्हापूर

चंदूरमध्ये अकरा महिन्यांच्या बालकाचा गटारीत पडून मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : घरासमोरील गटारीमध्ये पडून शौर्य सतीश पुजारी या 11 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी 10.30 च्या सुमारास हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे घडली. घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.

शौर्यच्या आई-वडिलांना मोठा धक्का

चंदूर येथे अभियंता सतीश पुजारी कुटुंबीयांसह राहण्यास आहेत. त्यांचा 11 महिन्यांचा मुलगा शौर्य घरात खेळत होता. बघता बघता तो नजर चुकवून उंबरा ओलांडून घराबाहेर गेला आणि घरासमोर असलेल्या गटारीत पडला. गटारीत गाळ साचल्याने तसेच तोंडावर पडल्याने त्यामध्ये बुडाला. कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. घरासमोरील गटारीत तो पडल्याचे निदर्शनास आले. त्याला इंदिरा गांधी इस्पितळात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. अवघ्या काही क्षणांत घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने शौर्यच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. इंदिरा गांधी इस्पितळात मोठी गर्दी झाली होती. याबाबतची वर्दी वैद्यकीय अधिकार्‍यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली. शौर्य याच्या मृत्यूच्या घटनेमुळे चंदूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT