Chandrakant Patil pudhari
कोल्हापूर

Chandrakant Patil: दिल्ली पोलिसांनी प्रत्येक दगड उचलला, त्यावरील फुटप्रिंट आधारशी लिंक होतील.. चंद्रकांत पाटलांचे सुचक वक्तव्य

Anirudha Sankpal

Chandrakant Patil On Delhi Protest: राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहे. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नुकतेच दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबत देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी अमित शहा यांच्यावर राहुल गांधी यांनी केलेले आरोप आणि दिल्ली पोलिसांच्या तपासाबाबत देखील वेगळी माहिती दिली.

दगडावरीलही फुटप्रिंट पाहणार

ज्यावेळी चंद्रकांत पाटील यांना राहुल गांधी आणि विरोधक गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागत आहेत याबाबत विचारले असता त्यांनी, 'लोकशाहीची ब्युटी अशी आहे की तुम्ही देखील आरोप करू शकता. ते तर लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आहेत. आरोप केले म्हणजे ते सर्व खरं असतं असं नाही.

पाटील पुढे म्हणाले की, 'दिल्ली पोलिसांनी फार मोठा रिपोर्ट तयार केला आहे. तो पाहिला तर आपल्याला चक्कर येईल. ज्यांना पकडलं ते कोणकोणत्या गुन्ह्याहत होते त्याचे पोलिसांनी विश्लेषण केलं आहे. पोलिसांनी सांगितलं की तिथं पडलेला प्रत्येक दगड उचलेला आहे. त्या दगडावर असणारे फुट प्रिंट आधारशी लिंक होतील.'

राहुल गांधींना सिद्ध करावं लागेल

चंद्रकांत पाटील यांनी, 'एका बाजूने राहुल गांधी हे अमित शहा यांनी लाठीचार्ज करायला लावला असा आरोप करत आहेत. दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आकडेवारी दिली आहे. याबाबत पोलिसांना देखील ते सिद्ध करावं लागेल आणि राहुल गांधी यांना देखील त्यांचे आरोप सिद्ध करावे लागतील.

संसदेत घुसले असते तर...

चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्रालय परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं का याबाबत विचारलं असता त्यांनी परदेशातील मदत आणि काही बॅड एलिमेंट या आंदोलनात होते अशी माहिती असल्यामुळेच आपण व्यवस्थित सर्व गोष्टी हाताळत होतो. जोपर्यंत संसदेकडे गेले नाहीत तोपर्यंत त्यांना कोणी काही केलं नव्हतं. पण ज्यावेळी ते संसदेकडे निघाले हे कळालं अन् ते संसदेत घुसले असते तर काय स्थिती निर्माण झाली असती याचा विचार तुम्ही करा असं उत्तर त्यांनी दिलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT