कोल्हापूर

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील ॲक्टिव्ह मोडवर

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी त्यांनी बैठकींचा धडाका लावला आहे. खासदार धनंजय महाडिक, समरजीतसिंह घाटगे यांच्यासह अनेक नेत्यांसोबत त्यांचे बैठकांचे सत्र सुरू आहे.

महाआघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांनी महायुतीच्या संजय मंडलिक यांचा तब्बल दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव करत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. निकालानंतर आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजपला कोणत्या बूथवर कमी मताधिक्य मिळाले, पराभवाची नेमकी कारणे कोणती? तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून बैठका घेतल्या जात आहेत. अगामी विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने मताधिक्य वाढवता येईल, यावर चर्चा केली जात असून प्रत्येक विधानसभानिहाय आढावा घेतला जात आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT