Campus to Career Pudhari Pudhari
कोल्हापूर

Campus To Career: कोल्हापूर, सांगली व सातारामधील विद्यार्थ्यांना पुण्यातील नामांकित विद्यापीठांना भेटण्याची सुवर्ण संधी

Pudhari Campus To Career Initiative: या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या विद्यापीठ निवडण्याची संधी मिळणार आहे

पुढारी वृत्तसेवा

Pune College Campus Visit

पुणे : पुढारी वृत्तसेवा सीईटीचे निकाल लागताच विद्यार्थ्यांना आता प्रवेशाचे वेध लागले आहेत. कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा हे निश्चित झाल्यानंतर आता सर्वात मोठे आव्हान आहे शैक्षणिक संस्था निवडीचे. परंतु विद्यार्थ्यांना, चिंता करू नका, पुढारी माध्यम समूह आणि कॅम्पस देखो डॉट एआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॅम्पस टूरची संधी देण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या विद्यापीठ निवडण्याची संधी मिळणार आहे.

पुणे म्हणजे 'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट', विद्येचे माहेरघर' अशा ठिकाणी दर्जेदार शिक्षण घेणे म्हणजे जीवनातला संस्मरणीय सुवर्णकाळ जगल्यासारखे आहे, पण त्यासाठी विद्यापीठाची निवड ही अचूक करणे तितकेच गरजेचे आहे. कॅम्पस अंतराच्या दृष्टीने योग्य आहे ना, त्यात साऱ्या सोयीसुविधा आहेत ना, तिथे प्लेसमेंटचे रेकॉर्ड कसे आहे, तिथे आपल्या भागातील कोणी मुले-मुली आहेत का, असे अनेक प्रश्न असतात. तुमचे पुण्यातील नातेवाईक तरी किती वेळ देणार अन् किती लक्ष घालणार? म्हणून आता सादर आहे स्वतःच जाऊन, बघून निर्णय घेण्याची सुवर्णसंधी!

करिअरच्या दृष्टीने कोणते विद्यापीठ योग्य ठरेल, पुण्यात नक्की शिक्षण कुठे घ्यावे, कोणत्या कोर्सला प्रवेश घ्यावा, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना आणि पालकांना पडलेले असतात. पुढारी आयोजित कॅम्पस टूरमध्ये कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील विद्यार्थ्यांच्या सगळ्या शंकांचे निरसन होईल. पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटी या नामांकित विद्यापीठांना भेट देता येणार आहे. विद्यापीठांचा परिसर, लायब्ररी, विविध लॅब, हॉस्टेल, जेवणाची व्यवस्था, क्रीडांगण, संस्थेचा परिसर आदी सुविधा त्यांना प्रत्यक्ष पाहता येतील.

अ‍ॅडमिशन विभागप्रमुख यांच्या समवेत चर्चा करता येईल. तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून करिअर समुपदेशन केले जाईल. विविध कोर्सेस आणि त्यांच्या प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. शिवाय तेथील विद्यार्थ्यांशीही बोलता येईल. तेव्हा आजच तुमचा सहभाग निश्चित करा. विद्यार्थीसंख्या मर्यादित आहे आणि प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी शुल्क फक्त ५०० रुपये आहे, तर पालकांसाठी ३ हजार रुपये आहे.

अशी आहे कॅम्पस टूर

साताऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी १ व २ जुलै, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांसाठी ४ व ५ जुलै रोजी, सांगलीतील विद्यार्थ्यांसाठी ७ व ८ जुलै रोजी कॅम्पस टूर आयोजित केली जाणार आहे.

त्वरा करा... आजच तुमचा सहभाग निश्चित करा! प्रवेश मर्यादित... प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य!

Pudhari

अधिक माहितीसाठी संपर्क

  • Kolhapur : ☎ 9923033440

  • Sangli : ☎ 8805007175

  • Satara : ☎ 9922913664

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT