

सातारा : विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हव्या असलेल्या करिअरविषयक मार्गदर्शनासाठी आता जास्त दिवस वाट पाहण्याची आवश्यकता नाही. दोनच दिवसांमध्ये अर्थात येत्या १९ व २० जूनला ‘पुढारी’ माध्यम समूहातर्फे ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’ या विशेष उपक्रमांतर्गत वाई व सातारा येथे १२ वी पास विद्यार्थ्यांना विशेष तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. वाई येथील कृष्णोत्सव कार्यालय येथे १९ रोजी तर कर्मवीर सभागृह, यशवंतराव चव्हाण, सायन्स काॅलेज, सातारा येथे २० रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २ या कालावधीत पार पडणार्या या उपक्रमासाठी पूर्व नावनोंदणी अनिवार्य असून, या उपक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानदेखील केला जाणार आहे.
या सेमिनारमध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, बी. फार्मसी, व्यवस्थापन, तसेच इतर सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी लागणारी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. याच मार्गदर्शनाच्या आधारे विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या क्षेत्रात करिअर करता येईल किंवा करिअरच्या नव्या वाटा आणि सुवर्णसंधी याविषयी निवड करण्याची संधी मिळणार आहे.
करिअर निवडीसाठी योग्य मार्गदर्शन हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग असून, या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांची आवड, क्षमता, शैक्षणिक पार्श्वभूमी आणि भविष्यातील संधी यांचा विचार करून तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. याशिवाय खासगी विद्यापीठे, डीम्ड विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांसाठी होणार्या प्रवेश परीक्षा, त्यांची प्रक्रिया आणि संधी याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे. सरकारी व खासगी शिष्यवृत्ती योजना, तसेच शैक्षणिक कर्ज मिळवण्याची प्रक्रिया यावरही सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
सर्व प्रवेश प्रक्रियांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, त्यांची अचूकता, तपासणी आणि वेळेत सादरीकरण यासाठीही विद्यार्थ्यांना व पालकांना प्रत्यक्ष मदत मिळणार आहे. त्यामुळे ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’ अंतर्गत आयोजित हे सेमिनार करिअर घडवणार्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी निर्णायक ठरणार आहे. यातून निवडलेल्या जिल्ह्यातील १०० विद्यार्थ्यांना ‘पुढारी’ माध्यम समूहाच्या वतीने पुणे येथे दोन दिवसांची माफक दरात सहल आयोजित केली असून पुण्यातील नामांकित संस्थेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊन स्वेच्छेने करिअर निवडण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात तुमची व्यक्तिगत सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. सायबर, डिजिटल तंत्रज्ञान, फॉरेन्सिक सायन्स आदींमधील करिअरविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
- मुकेश अगरवाल, प्रवेश विभागप्रमुख, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’च्या क्षेत्रात करिअरच्या संधी काय असतील, आयटी कंपन्यांमध्ये इंटर्नशीप कशी मिळवायची, उद्योगधंद्यांमधील ४.० आणि ५.० यांचे एकत्रिकरण होत असताना कशा प्रकारचे मनुष्यबळ आवश्यक असणार आहे, या भविष्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला आवडणार आहे.
- अजित गटे, अध्यक्ष, डिजीटेक रोबोटिक्स
केव्हा : शुक्रवार १९ जून २०२६
कुठे : कृष्णोत्सव कार्यालय, वाई
वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत
AI, डिजिटल तंत्रज्ञान आणि बदलत्या रोजगाराच्या जगात केवळ पदवी नव्हे तर योग्य कौशल्ये, योग्य मार्गदर्शन आणि योग्य करिअर निवड अत्यंत महत्त्वाची ठरते. "Campus to Career" या विशेष करिअर मार्गदर्शन सत्रात शिक्षणातील नवीन संधी, भविष्यातील करिअर पर्याय, उद्योगक्षेत्राच्या अपेक्षा आणि यशस्वी करिअरसाठी आवश्यक कौशल्यांविषयी सविस्तर चर्चा करूया. चला, शिक्षणापासून यशस्वी करिअरपर्यंतचा प्रवास अधिक सुजाण आणि सक्षम बनवूया!
प्रा. डॉ. राधाकृष्ण भास्कर बटुळे प्रमुख, व्यवस्थापन विभाग विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे
केव्हा : शनिवार, २० जून २०२६
कुठे : कर्मवीर सभागृह यशवंतराव चव्हाण सायन्स काॅलेज, सातारा
वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे, पण मार्गदर्शन व कौशल्यांअभावी संधी हुकतात. ऑनलाइन कोर्सेस, इंटर्नशिप आणि सरकारी योजनांतून कौशल्ये विकसित करता येतात. लक्षात ठेवा: पदवी दारापर्यंत नेते, पण कौशल्ये आत घेऊन जातात. म्हणून सतत शिकत राहा, सक्षम व्हा आणि विकसित भारत घडवा.
डॉ. प्रसन्नता रामतीर्थे सहाय्यक प्राध्यापक स्कूल ऑफ लॉ पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी
बारावीनंतर करिअर करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी संपूर्ण प्रवेश मार्गदर्शन
करिअर निवडीसाठी तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन
खासगी, डीम्ड विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची माहिती
सरकार व खासगी शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती
शैक्षणिक कर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन
विद्यार्थी व पालकांनी नोंदणी करणे आवश्यक
पुढारी कार्यालयात उपलब्ध फॉर्म भरून देता येईल.
अधिक माहितीसाठी ९१७२८४०७३९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा.
सोबत दिलेल्या https://pudharievent.campusdekho.ai या लिंकद्वारे ऑनलाईन नोंदणी करता येईल.