Kolhapur top area Burglary
टोप : हातकणंगले तालुक्यातील टोप येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आणि महामार्गाला लागूनच असलेल्या एका घरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. वैभव पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोकड असा एकूण ३ लाख २१ हजार २९४ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
गुरुवारी मध्यरात्री १२:३० ते पहाटे २:३० च्या सुमारास ही चोरी झाली. चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा उघडून आतील शोकेसमध्ये ठेवलेल्या दागिन्यांवर डल्ला मारला. १, ४१, ५४४ रुपये किमतीचा १६ ग्रॅमचा सोन्याचा लक्ष्मीहार आणि ४९, ७५० रुपयांची ठुशी. सुमारे ५०,००० रुपये किंमतीची दोन चांदीची कडी. ५०,००० रुपये किमतीचे ३ मोबाईल हँडसेट, ३०, ००० रोख रक्कम असा एकूण ३ लाख २१ हजार २९४ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
या घटनेबाबत वैभव बाळासो पाटील यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या सहाय्यक फौजदार मछले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. महामार्गालगतच्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.