राशिवडे ; पुढारी वृतसेवा भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत सरासरी ६७ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रामध्ये मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी तुरळक गर्दी होती. परंतु १० नंतर मतदान केंद्रावर गर्दी होऊ लागली. राधानगरी तालुक्यातील कोदवडे केंद्रावर उच्चांकी ९७ टक्के मतदान झाले.
राधानगरी, करवीर तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यातील घोटवडे, गुडाळ, राशिवडे, कसबा तारळे, कंथेवाडी, येळवडे तर करवीरमधील हसुर दु, सडोली खा,कोथळी, बेले, म्हाळुंगे या मतदान केंद्रांवर सरासरी साठ ते पासष्ट टक्के मतदान झाले. एका मतदाकेंद्रावर तीन ते चार टेबल असल्याने मतदान प्रक्रीया गतीने होत होती.
राधानगरी तालुक्यातील कोदवडे गावामध्ये ९६ टक्के मतदान झाले. सतारुढ आघाडीचे आमदार पी.एन.पाटील व संपतराव पवार यांनी सडोली केंद्रावर, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळेंनी घोटवडे येथे तर विरोधी परिवर्तन आघाडीचे हंबीरराव पाटील यांनी हळदी, सदाशिवराव चरापले व त कै.कौलवकर पँनेलचे धैर्यशील पाटील यांनी कौलव केंद्रावर मतदान केले. मतदान प्रक्रीया शांततेत सुरू आहे.
हेही वाचा :