ब्दुललाट येथे विद्युत डीपीचे पोल वाकले असल्याने धोकादायक बनले आहेत.  Pudhari Photo
कोल्हापूर

अब्दुललाट येथे विद्युत डीपीचे पोल वाकल्याने धोकादायक; महावितरणचे दुर्लक्ष

Kolhapur News | शेकडो एकरांतील ऊस शेतीला धोका

पुढारी वृत्तसेवा

अब्दुल लाट : पुढारी वृत्तसेवा : अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे महावितरणचे अनेक हाय व्होल्टेज डीपी उघड्यावर पडले आहेत. तर या डीपीचे पोल सुध्दा वाकले आहेत. त्यामुळे पोल कोणत्याही क्षणी कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याबाबत ग्रामस्थांनी महावितरणाला माहिती देऊनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.

घडसे मळा येथील डीपी जमिनीपासून अगदी कमी उंचीवर उघड्यावर पडले आहेत. पोल कललेले आहेत. त्यामुळे ट्रान्सफार्मर, डीपी यांना शॉर्टसर्किट होऊ शकतो. या डीपीजवळून लहान मुले व शेतकरी जनावरे घेऊन जातात. तसेच शेकडो एकरांतील ऊस शेतीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महावितरणच्या दुर्लक्षितेमुळे या ठिकाणी कोणतीही दुर्घटना झाली. तर सर्वस्वी महावितरण जबाबदार असेल. त्यामुळे अजून देखील वेळ गेलेली नाही. तत्काळ डीपी आणि पोलची दुरुस्ती करण्यात यावी.
- सोमेश संजय पाटील, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT