कोल्हापूर

Bear threat : विंझणे गावाजवळ अस्वलाचा वावर, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

शेतकऱ्यानी खबरदारी घेण्याचे वन खात्याकडून आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Bear Sighting Near Vinjhane Village; Atmosphere of Fear Among Farmers

चंदगड : पुढारी वृत्तसेवा

विंझणे (ता. चंदगड) गावाशेजारी वाडी शिवारात आठ दिवसांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. यादरम्यान विंझणे गावाजवळ एक किलोमीटर अंतरावर डोंगर नावाच्या शेतात अस्वलाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत चंदगड वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड, वनपाल चंद्रकांत पावसकर, सरपंच तानाजी पवार यांनी शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. डोंगर नावाच्या शेतात जांभूळ खाण्यासाठी जांभूळ झाडावर चढताना अस्वलाच्या नखांचे व्रण पडले आहेत. याबाबत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.

घटनास्थळी वनरक्षक सुरेखा चाळके व अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने जाऊन पाहणी केली. सदर व्रण हे अस्वलाचे असल्याचे वनपाल चंद्रकांत पावसकर यांनी सांगितले. यादरम्यान सरपंच तानाजी पवार यांनीही शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.

या ठिकाणापासून जवळच चाफवडे (ता. आजरा) जंगल लागून आहे. त्यामुळे अन्नाच्या शोधात अस्वलेही आता नागरी वस्तीकडे वळू लागल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. डोंगर शेतात जांभूळ खाण्यासाठी झाडावर चढताना झाडाच्या बुंध्यावर पडलेले अस्वलाच्या नखांचे व्रण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT