चंदगड; पुढारी वृत्तसेवा : तब्बल ८ फूट लांबीचा किंग कोब्रा आज (दि.११) पार्ले गावात आढळून आला. पार्ले येथील भिकाजी मयेकर यांच्या पोल्ट्री फार्म जवळ सायंकाळी ५ च्या सुमारास हा किंग कोब्रा दिसल्याने एकच धावपळ उडाली. अथक प्रयत्नानंतर या कोब्राला पकडण्यात वनविभागाला यश आले. त्यानंतर त्याला कोदाळी – तिलारीच्या जंगलात सुरक्षित सोडण्यात यश आले.
भिकाजी दळवी हे पोल्ट्री शेडजवळ काम करीत असताना त्यांना भला मोठा १२ फूट लांबीचा किंग कोब्रा निदर्शनास आला. तात्काळ त्यांनी वनविभागाला पाचारण केले. जवळच पाटणे कार्यालय असल्याने वनविभागाने रेस्क्यू टीमचे संजीव टक्केकर, अर्जुन टक्केकर ( रा. ढोलगरवाडी ), आशिष जाधव ( रा. शिनोळी ) यांना बोलावून घेतले. तोपर्यंत कोब्राच्या हालचालींवर वनविभागाच्या पथकाची नजर होती. टक्केकर व जाधव यांनी धाडसाने कोब्राला पकडत कोदाळी- तीलरीच्या घनदाट जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले. यावेळी वनक्षेत्रपाल पी. ए. आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नेताजी धामणकर, वनपाल नागवेकर, कलाळ, तुकाराम गुरव, विश्वनाथ नार्वेकर, शुभम बांदेकर यांनीही उपस्थिती दर्शवली.
पार्ले गावाच्या सभोवती घनदाट असे जंगल आहे. या गावाने हिंस्र प्राणी अनेकदा पाहिले आहेत. मात्र तब्बल ८ फूट लांबीचा किंग कोब्रा पहिल्यांदाच गावकऱ्यांनी पाहिला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा :