Ajit Pawar visit Balumama Temple Admapur
मुदाळतिट्टा: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
मुरगूड (ता. कागल) येथील नियोजित कार्यक्रम आटोपून उपमुख्यमंत्री अजित पवार बिद्री (ता. कागल) येथील नियोजित कार्यक्रमाला जात असताना त्यांनी आदमापूर येथे थांबून बाळूमामा मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी बाळूमामा मंदिर समितीच्या वतीने कार्याध्यक्षा रागिनी खडके, अध्यक्ष धैर्यशील राजेभोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार केला. यावेळी पवार यांनी बाळूमामा मंदिरास राज्य शासनाच्या वतीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बाळूमामा देवालय समितीचे सर्व ट्रस्टी, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.