कोल्हापूर

आज-यात भिंत कोसळून प्राध्यापिका, विद्यार्थीनी ठार, एक गंभीर

Ajara News | जेसीबीच्या साहाय्याने जुनं घर पाडत असताना ही दुर्घटना घडली

पुढारी वृत्तसेवा

आजरा : शहरात भिंत अंगावर कोसळून महाविद्यालयीन प्राध्यापिका व शाळकरी मुलगी जागीच ठार झाल्या. तर एक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. यामध्ये कु. वैष्णवी तुकाराम भोसले (वय : १४ वर्षे) व प्रा. ज्योती नितीन कुंभार (वय : ४२ वर्षे) या ठार झाल्या. तर ललिता तुकाराम भोसले (वय : ४५ वर्षे) या गंभीर जखमी झाल्या आहेत. सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली.

घराची भिंत पाडायचे काम सुरू असताना वैष्णवी, आई ललिता व प्रा. ज्योती कुंभार या रस्त्यावरून जात होते. त्यावेळी भिंत जे सीबीच्या सहाय्याने पाडत असताना अचानक रस्त्यावर कोसळली. यामध्ये कु. वैष्णवी व प्रा. ज्योती या जागीच ठार झाल्या. तर ललिता यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

घटनास्थळी नगराध्यक्ष अशोक चराटी, डी वाय एसपी,तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार विकास कोलते,मंडल अधिकारी सुंदर जाधव,वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल पाटील, सर्व नगरसेवकांनी भेट दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT