Pratap Sarnaik | इचलकरंजीला 15, कुरुंदवाडला 10 जिजाऊ बसेस देणार : मंत्री प्रताप सरनाईक

जयसिंगपूर बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा संपन्न
Pratap Sarnaik visit Kolhapur District
जयसिंगपूर येथील बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाला.Pudhari
Published on
Updated on

Pratap Sarnaik visit Kolhapur District

जयसिंगपूर : एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 1 जूनपासून राज्यातील सर्वच बसस्थानकावरील असलेली सुलभ शौचालय आता मोफत देणार आहेत. तसेच दर 4 तासाला स्वच्छता करण्यात येणार आहे. मोफत एसटीच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी महायुतीची सरकार नवनवीन योजना अंमलात आणत आहेत.

त्याचबरोबर नुकत्याच उद्घाटन केलेल्या जिजाऊ 3 बाय 2 च्या बसेस इचलकरंजीला 15 तर कुरूंदवाडला 10 नवीन बसेस देणार आहे. जयसिंगपूर बसस्थानकावर दुमजली भक्ती निवाससाठी लागेल तो निधी देणार असल्याचे आश्वासन एसटी परिवहन विभागाचे मंत्री मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

Pratap Sarnaik visit Kolhapur District
Kolhapur News : सर्व शिक्षा अभियान बंद; कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

जयसिंगपूर येथील बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी दुपारी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. स्वागत नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी करीत जयसिंगपूर येथे स्वतंत्र वाहतुक कक्ष स्थापन करण्याची मागणी करत निवेदन दिले.

प्रास्ताविक प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हनकर यांनी केले.

यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूर हे शाहु महाराजांनी आखीव-रेखीव शहर वसविले आहे. शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्वतंत्र वाहतुक कक्ष स्थापन करा. इचलकरंजी येथे आरटीओ ऑफिस मंजुर झाले आहे. यासाठी एटीस (स्वयंचलित चाचणी स्टेशन) साठी लागणारी जागा जांभळी-हरोली येथे उपलब्ध आहे. शिवाय कुरूंदवाड आगाराला नव्या बसेस उपलब्ध करून द्यावा. शिवाय यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

Pratap Sarnaik visit Kolhapur District
Kolhapur temperature | पार्‍याची पुन्हा उसळी; कोल्हापूर @39

यावेळी आमदार अशोकराव माने, माजी आमदार उल्हास पाटील, गणेश बेकरीचे चेअरमन आण्णासाहेब चकोते, विभागीय नियंत्रक अभय देशमुख, विभागीय वाहतुक अधिकारी अनिल मेहतर, समाजकल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, मिलींद भिडे, नगरसेवक पराग पाटील, जि.प.सदस्य अमोल चव्हाण, आगार प्रमुख आस्मा बिस्मिल्ला सय्यद, रविंद्र भोसले यांच्यासह नगरसेवक, जि.प.सदस्य, प.स.सदस्य, मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news