कोल्हापूर

Nanibai chikhali kolhapur news | महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक; नानीबाई चिखली बंधाऱ्यानजीक संगमेश्वर मंदिरात अघोरी प्रकार

भाविकांमध्ये तीव्र संताप आणि अस्वस्थता पसरली असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत

पुढारी वृत्तसेवा

नानीबाई चिखली : येथील बंधाऱ्याजवळ असलेल्या संगमेश्वर महादेव मंदिरात अज्ञात व्यक्तींकडून अघोरी प्रकार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप आणि अस्वस्थता पसरली असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अशी अघोरी पूजा करणाऱ्याच्या शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा अघोरी प्रकार आज रविवारी (दि.३१) सकाळी मंदिरात नेहमीप्रमाणे पूजेसाठी आलेल्या पुजाऱ्याच्या व दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या नजरेस आला. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक मंदिर परिसरात जमले. पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले.

धार्मिक स्थळाची विटंबना करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात असा प्रकार होणार नाही अशा भावना व्यक्त होत आहेत . या घटनेमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे समाज माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT