कोल्हापूर

कुरुंदवाड पोलीस ठाण्यात सेवा बजावत असताना पोलीस नाईकाचा मृत्यू

निलेश पोतदार

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा कुरुंदवाड पोलीस ठाण्यात सेवा बजावत असताना आज (शुक्रवार) पहाटे पोलीस नाईक अरुण बालाजी नागरगोजे (वय.38) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

नागरगोजे हे गुरुवारी रात्री रात्रपाळी सेवा बजावत होते. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी अंकुर हॉस्पिटल येथे नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा मोठा धक्का बसल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

अरुण नागरगोजे हे लातूर जिल्ह्यातील पाटोदा येथील मूळ रहिवाशी असून, कुरुंदवाड येथे तीन वर्षांपूर्वी कोल्हापूर येथून त्यांची बदली झाली होती. अब्दुललाट विभागात ते कार्यरत होते. त्यांच्या निधनाने कुरुंदवाडसह परिसरात शोककळा पसरली आहे. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. मनमिळावूपणा व सुस्वभवामुळे ते कुरुंदवाडमध्ये लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या पोलीस सेवेच्या माध्यमातून अनेक गुन्ह्यांचा छडा लावला होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कुरुंदवाड व परिसरातील नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या मागे आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT