Ganesh Chaturhi 2024 Pudhari Online
कोल्हापूर

Ganesh Chaturthi 2024 | गंगा-गौरीच्या सजावटीचा नवा ट्रेंड

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

चैतन्य आणि मांगल्याचा खजिना घेऊन घरोघरी येणाऱ्या लाडक्या गणपतीपाठोपाठ गंगा-गौरी, शंकरोबा यांचेही आगमन होत असते. गंगा- गौरीच्या सजावटीसाठी वैविध्यपूर्ण वस्तूंनी शहरातील प्रमुख मार्केट बहरले असून, खरेदीसाठी गर्दी होत आहे.

गौरीच्या स्वागताची तयारी मुखवटे खरेदीपासून सुरू होत आहे. बाजारगेट, पापाची तिकटी कुंभार गल्ली, शाहूपुरी कुंभार गल्ली, स्टेशन रोड, राजारामपुरी येथील दुकानांसह स्टॉलवर गौरीचे विविध मुखवटे लक्ष वेधून घेत आहेत.

यामध्ये चेहरा, हाफ बॉडी आणि फुल बॉडी अशा तीन प्रकारांमध्ये गौरीचे मुखवटे उपलब्ध आहेत. मुखवट्यांमध्येच कोरलेले दागिने आहेत, तर काही मुखवट्यांमध्ये दागिने घालण्यासाठी सोय आहे. ग्लॉसी व मॅट प्रकारात गौरी मुखवटघांनी बाजारपेठ सजली आहे.

फुल बॉडी तीन टप्प्यांत फोल्ड होत असल्याने उत्सवानंतर ती सुरक्षितपणे ठेवण्यास मदत होत आहे. फुल बॉडीला यंदा मागणी वाढली आहे. स्टैंडमुळे गौरी उभा करणे सोपे आहे सजावट सोपी करणारे विविध प्रकारचे स्टेंडल थेट बाजारात आले आहेत.

यामध्ये तीन पायांच्या गौरीच्या चेहऱ्यापर्यंतचा मुखवटा ठेवण्यासाठी दांडीच्या स्टैंडला पसंती मिळत आहे. ज्यांना हाफ बॉडीची गौरी सजवायची आहे किंवा स्पंज, फोमची तयार वस्त्रांची बॉडी सजवायची आहे, त्यांच्याकडून विनादांडी स्टँडची खरेदी केली जात आहे.

दागिन्यांचा साज खुणावतोय

गौरीला सजवण्यासाठी साडी, दागिने यांची इतकी महिलांना काय आणि किती घेऊ, असा प्रश्न पडत आहे. मंगळसूत्र, कंठी, नेकलेस, बोरमाळ, लक्ष्मीहार, कंबरपट्टा अशा पारंपरिक दागिन्यांचा साज महिलांना खुणावत आहे.

साड्यांमध्ये काठपदराची साडी खरेदीकडे कल वाढत आहे. सहावारी व नऊवारी रेडिमेड साड्याही उपलब्ध आहेत. शंकरोबाचीही पूर्ण ड्रेपरी व फुल बॉडी खरेदी केली जात आहे.

SCROLL FOR NEXT