केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली भीषण आग  Pudhari Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृह आग प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळीत दुर्घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी आग लावली असावी अशी तक्रार नाट्यगृहाचे अतिरिक्त व्यवस्थापक समिर इस्माईल महाब्री (वय ४८ रा. शहाजी वसाहत) यांनी शुक्रवारी (दि.30) रात्री दाखल केली. कलानगरी कोल्हापूरातील सुप्रसिध्द संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहास दि.८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी अचानक आग लागली होती. या आगीत खासबाग कुस्ती मैदानाकडील मुख्य मंच आणि संपूर्ण नाट्यगृह जळूण खाक झाले होते.

यामध्ये नाट्यगृहाचे १६ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यात नाटगृहावरील कौले, लोखंडी पत्रे, सागवानी लाकडाचे रुफकाम, त्याखालील सिलींग, लाकडी बाल्कनी नाट्यगृहातील सर्व खुर्च्या, खिडक्या, दरवाजे, लाकडी जिना, नाटयगृहाच्या पाठीमागील भिंतीला असलेली ए.सी. सिस्टीमचे चार युनीट व बाल्कनीच्या खालील बाजूस असलेल्या सिलींगवरील ए.सी.चे तीन युनिट, लाईट रुम व साऊंड रुम मधील सर्व साहित्य, स्टेज वरील सर्व साहित्य वगैरे तसेच खासबाग मैदानमधील स्टेजचे लाकडी, लोखंडी खांब, लाकडी रुपकाम, पत्रा कौले, स्टेजवरील कुस्ती मॅट, नेट आदींचा समावेश होता.

केशवराव भोसले नाटयगृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खासबाग मैदानमधील स्टेजला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी आग लावली असावी. ती आग नाटयगृहाचे इमारतीस लागून त्यामध्ये नाट्यगृहाचे १६ कोटी २० लाखांचे नुकसान झाल्याचे महाब्री यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबाबत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संजीव झाडे हे करणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT