बंगाली कारागिराला सोने चोरीप्रकरणी अटक 
कोल्हापूर

कोल्हापूर : 53 लाखांचे सोने घेऊन पसार झालेल्या बंगाली कारागिराला अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दागिने करण्यासाठी दिलेले चोख सोने घेऊन पसार झालेल्या काशीनाथ बिधान पत्रा (वय 40, रा. कासार गल्ली, गुजरी, कोल्हापूर, मूळ रा. पश्चिम बंगाल) याला पोलिसांनी अटक केली. विविध सराफी पेढ्यांकडून 53 लाख 64 हजार रुपयांचे 844.731 ग्रॅम सोने घेऊन बंगाली कारागीर 15 फेब—ुवारीपासून बेपत्ता झाला होता. जुना राजवाडा पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

14 फेब—ुवारी रोजी सायंकाळी 7 ते 15 फेब—ुवारी 2024 सकाळी 11 या कालावधीत कासार गल्ली, गुजरी येथून बंगाली कारागीर काशीनाथ पत्रा, शुभंकर अरुण माईती (रा. उदयपूर, वेस्ट बंगाल), सोमन पत्रा, बिटू (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), शांतनू (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), मॅनेजर सपन प्रामाणिक (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) हे सहा आरोपी फिर्यादी राघवेंद्र काशीनाथ रेवणकर (47, रा. गणेश कॉलनी, कळंबा) व त्यांच्या मित्रांचे 844.731 ग्रॅम वजनाचे 24 कॅरेट असलेल्या चोख कॅटबरीचे तुकडे (53 लाख 64 हजार) दागिने तयार करून न देता घेऊन गेले.

SCROLL FOR NEXT