जयसिंगपूर बाजार समिती  
कोल्हापूर

जयसिंगपूर बाजार समितीसाठी कुरूंदवाड केंद्रावर १२ वाजेपर्यंत ७० टक्‍के मतदान

निलेश पोतदार

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा जयसिंगपूर बाजार समितीसाठी आज (रविवार) सकाळी सात वाजता मतदान प्रकियेला सुरुवात झाली. बारा वाजेपर्यंत 70 टक्के इतके मतदान झाले. दोन्ही आघाडीकडून सोसायटी व ग्रामपंचायतीचे मतदार खेचण्यासाठी चढाओढ सुरू आहे. मतदान केंद्राबाहेर दोन्ही गटाच्या समर्थकांनी गर्दी केली आहे. निवडणुकीसाठी चुरस निर्माण झाली आहे. शांततापूर्ण वातावरणात मतदान सुरू आहे.

कुरुंदवाड येथील साने गुरुजी विद्यालय येथे संस्था सोसायटी मतदारांसाठी दोन केंद्रे तर ग्रामपंचायत मतदानासाठी एका केंद्रावर मतदानाला उत्साहात सुरवात झाली. संस्था सोसायटी गटाच्या 5 क्रमांक केंद्रावरती 395 पैकी 264, 6 क्रमांक केंद्रावर 421 पैकी 321 तर ग्रामपंचायत गटाच्या 7 क्रमांकाच्या केंद्रावर 238 पैकी 156 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. संस्था सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी मतदारांनी केंद्राबाहेर मोठी गर्दी केली आहे.

या केंद्रावर संस्था सोसायटी व ग्रामपंचायतचे 1 हजार 54 मतदार आहेत. 4 वाजेपर्यंत 100 टक्के मतदान होईल असा अंदाज दोन्ही आघाडीच्या समर्थकांकडून केला जात आहे. दोन्ही आघाडींकडून विजयाचाही दावा केला जात आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT