वेत्येमध्ये 12 फुटी मगर वनविभागाकडून जेरबंद (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Vetye Crocodile Rescue | वेत्येमध्ये 12 फुटी मगर वनविभागाकडून जेरबंद

मळगाव- वेत्ये येथील येथील ओढ्यातून वनविभागाने बारा फूट लांबीची मगर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिली.

पुढारी वृत्तसेवा

मळगाव : मळगाव- वेत्ये येथील येथील ओढ्यातून वनविभागाने बारा फूट लांबीची मगर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिली. वेत्ये श्री कलेश्वर मंदिरा लगतच्या ओढ्यात गेले काही दिवस ही मगर वास्तव्यास होती. या मगरीला वनविभागाच्या जलद कृती दलाच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले व सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वनविभागाने रविवारी सायं. 4 वा. च्या सुमारास जलद कृती दलाचे पथक घटनास्थळी पाठवले.

जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांच्यासह जवान शुभम कळसुलकर, आनंद राणे, आणि प्रथमेश गावडे यांनी अत्यंत कौशल्याने व सावधगिरीने या 12 फुटी मगरीला जेरबंद केले. वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, तसेच जितेंद्र गांवकर, बाळू गांवकर, बाळू गावडे आदींसह परिसरातील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT