Sawantwadi Suicide Case File Photo
सिंधुदुर्ग

Sawantwadi Suicide Case | सावंतवाडी-बिरोडकर टेंब येथे युवक-युवतीची आत्महत्या

Sawantwadi Suicide Case | अवघ्या अर्धा तासात घडल्या दोन घटना; शहरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी-बिरोडकर टेंब परिसर युवक-युवतीच्या आत्महत्येने हादरून गेला. बुधवारी दुपारी २.३० वा युवतीने घरातच खोलीत छपराला, तर ३ वा. मुलाने चिवार टेकडी येथील शेतात झाडाला गळफास घेत जीवन संपविले. प्रांजल वैभव बिरोडकर (१८) आणि अभिजित तुकाराम बिरोडकर (२७, दोघेही रा. सावंतवाडी बिरोडकर टेंब) अशी त्यांची नावे आहेत. घटनास्थळी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण. उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी भेट देत तपास केला. या दोन्ही आत्महत्येमागचे कारण समजले नाही.

बिरोडकर कुटुंबीय सबनिसवाडा येथील एकमुखी दत्ता मंदिर कलश रोहण सोहळ्यासाठी गेले होते. दुपारी तेथे महाप्रसाद घेतल्यानंतर प्रांजल काकासोबत घरी आली. तिचे वडील या कार्यक्रमातूनच आपल्या कार्यालयात गेले.

घरात आई, काका व कुटुंबीय असे होते. दरम्यान, प्रांजल आपल्या खोलून उशिरापर्यंत न आल्याने काका आणि आईने तिला आवाज दिला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने आईने आरडा ओरडा केला. त्यानंतर दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ती गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. हा प्रकार पाहून बिरोडकर कुटुंबीयांना एकच धक्का बसला. शेजारांच्या मदतीने रिक्षा बोलावून तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर यांनी घोषित केले.

प्रांजल ही शहरातील महाविद्यालयात बारावीत शिकत होती. नुकताच तिने बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. दरम्यान, प्रांजल हिच्या मृत्यूचा पंचनामा सुरू असताना अवघ्या दीड तासातच त्याच परिसरात चिवार टेकडी येथे शिवारात एका युवकाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मोटारसायकल नागरिकांना आढळून आली, त्यापुढे एका झाडाला युवकाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पोलिसांन युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला. नागरिकांनी तो युवक अभिजित तुकाराम बिरोडकर असल्याचे ओळखले.

दोन घटनांनी पोलिस चक्रावले

या दोन्ही आत्महत्येच्या घटनांनी पोलिस चक्रावून गेले. बिरोडकर टेंब या एकाच वाडीतील युवक-युवतीने आत्महत्या केल्याचे उघड होताच शहरात खळबळ उडाली. अभिजित हा शहरातील एका ज्वेलर्स शॉपमध्ये नोकरीस होता. मुलीच्या आत्महत्येनंतर पाठोपाठ या युवकाने आत्महत्या केल्याने सर्वांना धक्का बसला. त्याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. युवतीच्या मागे आई, वडील, बहीण, आजी, आजोबा, काका काकी, असा परिवार आहे. दोन दिवसांपूर्वी याच वाडीतील एका मुलाने वरच्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT