Oros Goa Liquor Seizure
ओरोस: गोवा येथून मुंबईच्या दिशेने अवैधपणे गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला. यावेळी टेम्पो चालक राघोबा रामचंद्र कुंभार (वय ३५, रा. पेडणे, माऊसवाडी, ता. पेडणे, गोवा) याला अटक केली आहे. ही कारवाई गोवा - मुंबई महामार्गावरील ओरोस येथील हॉटेल राजधानी समोर सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली.
या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात चालकासह टेम्पो मालक मिलींद राणे (रा. इन्सुली, ता. सावंतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर टेम्पोची अंदाजे किंमत २५ लाख रुपये, आणि ५५ लाख ७५ हजार ६८० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु असा एकूण ८० लाख ७५ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, पोलीस उपनिरीक्षक, समीर भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश कन्हाडकर, सायबर पोलीस ठाण्याचे रामचंद्र शेळके, सहा. पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, प्रकाश कदम, किरण देसाई, बस्त्याव डिसोझा, जॅक्सन घोन्साल्वीस, पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजिस्कर यांनी केली. पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करीत आहेत.