Medical college MD MS : सिंधुदुर्ग वैद्यकिय महाविद्यालयात एमडी व एमएस अभ्यासक्रम सुरु करा

वैद्यकीय शिक्षण विभाग सह संचालक डॉ. पल्लवी सापळे यांच्या सूचना
MD MS courses sindhudurg
सिंधुदुर्गनगरी ः वैद्यकीय शिक्षण सहसंचालक पल्लवी सापळे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. सोबत अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे व इतर.pudhari photo
Published on
Updated on

ओरोस ः सिंधुदुर्ग वैद्याकिय महाविद्यालयात एमडी व एमएस हे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सह संचालक डॉ. पल्लवी सापळे यांनी केली. डॉ. सापळे यांनी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट दिली असता ही सूचना केली.

डॉ. पल्लवी सापळे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आढावा बैठक घेतली. संस्थेचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे यांनी संस्थेच्या विविध कामकाजाबाबत स्थितिदर्शक सादरीकरण केले. संस्थेस सन 2025-26 या वित्तीय वर्षात राज्ययोजने अंतर्गत व जिल्हा नियोजन समिती मार्फत खरेदी करण्याकरिता आवश्यक यंत्रसामुग्रीचे प्रस्ताव शासनास लवकरात लवकर सादर करण्याबाबत. डॉ. पल्लवी सापळे यांनी सूचना दिल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे नुकतेच जनरल मेडिसिन, ऍनेस्थेशिया व स्त्रीरोगशास्त्र या विषयांमध्ये डीएनबी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु झाले असून एकूण 4 पदव्युत्तर विद्यार्थी प्रवेशित झाले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. दवंगे यांनी दिली. यावर संस्थेमध्ये सर्वच विषयांमध्ये एम.डी., एम.एस. हे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याची आवश्यकता असून त्याबाबत लवकरच कार्यवाही करण्याबाबत डॉ. पल्लवी सापळे यांनी सूचना दिल्या.

विद्यार्थ्यांच्या व्याख्यानगृहाला भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डॉ. सापळे यांनी त्यानंतर रुग्णालयाचा राउंड घेतला, लघुशस्त्रक्रियागृहाच्या नियोजित जागेची पाहणी केली. अपघात कक्षाला भेट देऊन कार्यरत डॉक्टर्स व नर्सेस यांचेशी संवाद साधून रुग्णांविषयी विचारपूस केली. रुग्णालयामध्ये हाय डिपेन्डन्सी युनिट सुरु करण्याबाबत त्यांनी अधिष्ठाता यांना सूचना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news