मळगाव : गेले चार दिवस कोसळणार्या संततधार पावसामुळे तळवडे-होडावडे पंचक्रोशीतील नदीनाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तळवडे-होडावडे पंचक्रोशीत गेले चार दिवस संततधार पाऊस कोसळत आहे.
पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी भातशेतीत गेल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे. सावंतवाडी, तुळस वेंगुर्ले मार्गावरील तळवडे-होडावडा पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे बुधवार सकाळपासून वाहतूक ठप्प झाली होती.
तुळस मार्गावरील एसटी बसच्या काही फेर्या पर्यायी मार्गावरुन उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीस सामोरे जावे लागले.