देवगड : किरकोळ कारणावरून झालेल्या वादात मुलाने वडिलांना शिवीगाळ व हाताच्या थापटाने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सुरीने त्यांच्या हाताच्या बोटांवर वार करून त्यांना दुखापत केल्याची घटना दहिबाव-बागमळा येथे घडली.
सागर विलास पाटकर (वय 30) असे संशयिताचे नाव असून या घटनेची फिर्याद त्याचे वडील विलास भिवा पाटकर (50) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे. संशयित सागर पाटकर याच्याविरुद्ध देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 3 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वा. च्या सुमारास घडली. विलास पाटकर व त्यांचा मुलगा सागर हे दोघे एकाच घरात विभक्त राहतात.
3 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वा. च्या सुमारास त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादात सागर याने आपल्या वडिलांना शिवीगाळ करून हाताच्या थापटाने मारहाण केली.
तसेच सुरीने त्यांच्या हाताच्या बोटांवर वार करून दुखापत केली. याबाबत दाखल फिर्यादीनुसार संशयित सागर याच्याविरुद्ध देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.