ZP Teacher Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg ZP Teacher Recruitment| सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात 180 पदांची भरती; 20 ऑगस्टपर्यंत अर्जाची मुदत!

Sindhudurg ZP Teacher Recruitment| 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' अंतर्गत संधी

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत युवक-युवतींना शासकीय आस्थापनेमध्ये ११ महिन्यांसाठी कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींना रोजगाराभिमुख कार्य प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन जि. प. प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर

(www.cmykpy.mahaswayam.gov.in) ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २० ऑगस्ट पर्यंत आहे.
जि. प. सिंधुदुर्गच्या प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत एकूण १८० कुशल व अर्धकुशल कार्य प्रशिक्षणार्थी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये उपशिक्षक/पदवीधर शिक्षक (मराठी माध्यम) १३९ पदे, उपशिक्षक/पदवीधर शिक्षक (उर्दू माध्यम) ६ पदे, डेटा एंट्री ऑपरेटर कम क्लार्क १८ पदे आणि बहुउद्देशीय कर्मचारी १७ पदे यांचा समावेश आहे.

तालुकानिहाय पदांचा तपशील

  • देवगड: मराठी माध्यम शिक्षक २०, उर्दू माध्यम शिक्षक १, डेटा एंट्री ऑपरेटर १, बहुउद्देशीय कर्मचारी १ (एकूण २३).

  • दोडामार्ग: मराठी माध्यम शिक्षक ९, उर्दू माध्यम शिक्षक ०, डेटा एंट्री ऑपरेटर १, बहुउद्देशीय कर्मचारी १ (एकूण ११).

  • कुडाळ: मराठी माध्यम शिक्षक २०, उर्दू माध्यम शिक्षक १, डेटा एंट्री ऑपरेटर १, बहुउद्देशीय कर्मचारी १ (एकूण २३).

  • कणकवली: मराठी माध्यम शिक्षक २०, उर्दू माध्यम शिक्षक १, डेटा एंट्री ऑपरेटर १, बहुउद्देशीय कर्मचारी १ (एकूण २३).

  • मालवण: मराठी माध्यम शिक्षक २०, उर्दू माध्यम शिक्षक १, डेटा एंट्री ऑपरेटर १, बहुउद्देशीय कर्मचारी १ (एकूण २३).

  • सावंतवाडी: मराठी माध्यम शिक्षक २३, उर्दू माध्यम शिक्षक १, डेटा एंट्री ऑपरेटर १, बहुउद्देशीय कर्मचारी १ (एकूण २६).

  • वैभववाडी: मराठी माध्यम शिक्षक ९, उर्दू माध्यम शिक्षक १, डेटा एंट्री ऑपरेटर १, बहुउद्देशीय कर्मचारी १ (एकूण १२).

  • वेंगुर्ला: मराठी माध्यम शिक्षक १८, उर्दू माध्यम शिक्षक ०, डेटा एंट्री ऑपरेटर १, बहुउद्देशीय कर्मचारी १ (एकूण २०).

  • मुख्यालय: मराठी माध्यम शिक्षक ०, उर्दू माध्यम शिक्षक ०, डेटा एंट्री ऑपरेटर १०, बहुउद्देशीय कर्मचारी ९ (एकूण १९).

पात्रता व वयोमर्यादा

याकरिता उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे व कमाल ३५ वर्षे असणे आवश्यक आहे.

  • उपशिक्षक (मराठी माध्यम): १२ वी, डी.एड. पदविका / पदवी अधिक बी.एड. पदवी (मराठी माध्यमातून उत्तीर्ण).

  • उपशिक्षक (उर्दू माध्यम): १२ वी, डी.एड. पदविका / पदवी अधिक बी.एड. पदवी (उर्दू माध्यमातून उत्तीर्ण).

  • डेटा एंट्री ऑपरेटर कम क्लार्क: १२ वी अथवा पदवी, MS-CIT किंवा तत्सम प्रमाणपत्र उत्तीर्ण तसेच मराठी/इंग्रजी टायपिंग ३० किंवा ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.

  • बहुउद्देशीय कर्मचारी: पदवी / १२ वी उत्तीर्ण आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT