Vengurla jewelry theft
वेंगुर्ला: वेंगुर्ला शहरातील विनायक रेसिडेन्सी येथून एका महिलेचे मंगळसूत्र (सुमारे 25 ग्रॅम वजनाचे ) अज्ञात व्यक्तीने कपाटातून चोरून नेले आहे. ही चोरीची घटना शनिवारी (दि. 1) सकाळी 11 ते सायंकाळी 5 च्या कालावधीत घडली.
याप्रकरणी प्रतिमा प्रकाश जाधव (वय 48) यांनी वेंगुर्ला पोलिसात फिर्याद दिली आहे. दाखल फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात वेंगुर्ला पोलीस स्थानकात बीएनएस 305 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व पीएसआय योगेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगवान चव्हाण अधिक तपास करीत आहेत.