

Konkan region crop loss
अजय गडेकर
वेंगुर्ला: वेंगुर्ला तालुक्यात अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बऱ्याचशा क्षेत्रावरील अंदाजे 500 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आजपर्यंत एकूण 2370 मिमी पावसाची नोंद झाली असून बुधवारी जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सहाय्य्क कृषी अधिकारी प्रकाश मोहिते यांच्यासह कृषी विभागामार्फत पाहणी व पंचनामा प्रक्रिया सुरु आहे. वेंगुर्ला तालुक्यातील आडेली येथील शेतकरी अशोक शंकर गडेकर यांचे भातशेतीचे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच तुळस कार्यक्षेत्रतील सुरेश बापू नाईक यांचे 14 गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले. आत्माराम नारायण नाईक यांचे 80 गुंठे क्षेत्रातील, भिवा जनार्दन नाईक यांचे 80 गुंठे क्षेत्रातील, गणेश वसंत नाईक यांचे 25 गुंठे क्षेत्रातील, वजराट देवसू येथील दिगंबर बापू पेडणेकर यांचे 24 गुंठे क्षेत्रातील भातशेतीचे नुकसान झाले आहे.
पेंडूर सातवायंगणी येथील प्रमोद शिरोडकर, उदय हिराजी वैद्य, उत्तम वैद्य, सत्यवान वैद्य, मातोंड येथील उत्तम शिवराम सावंत, सत्यवान परब, उत्तम विष्णु परब, रविंद्र मातोंडकर, सखाराम गोपाळ परब, दिनेश हरी परब, रमेश सुरेश परब, सखाराम सोनू परब, नारायण कृष्णा गावडे आदी शेतकऱ्यांचे तर पेंडुर येथील नारायण गणपत नाईक, भिकाजी यशवंत नाईक, चंद्रकांत दत्ताराम नाईक.
आडेली येथील हरिश्चंद्र केशव सोन्सुरक यांचे 30 गुंठे, बाबाजी अनंत येरम 40 गुंठे, पालकरवाडी येथील संजय सिताराम राऊळ, आडेली भंडारवाडी येथील गंगाराम शिवा मुंडये 40 गुंठे क्षेत्रावरील मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील अन्य कार्यक्षेत्रतील बहुसंख्य शेतीवर उदरनिर्वाह असणाऱ्या शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
सहाय्य्क कृषी अधिकारी प्रकाश मोहिते यांच्यासह कृषी विभागामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून व पंचनामे प्रक्रिया वेगाने सुरु आहे. संपूर्ण तालुक्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून अवकाळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी गोरगरीब शेतकऱ्यांना विनाअट नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे.