दोडामार्ग ः युवा पिढीत नशेली पदार्थांचे सेवन दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील युवकांनी एकत्र येत अमली पदार्थ सेवन केल्याने होणारे दुषपरिणाम आणि त्याचा कुटुंबावर होणारा आघात याचे समाज प्रबोधन करणारी लघु चित्रफित बनवली आहे. या चित्रफितीचे अनावरण दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. मसुरकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. हा लघु चित्रपट शाळेत, महाविद्यालयात मोफत दाखविण्याची मोहीम युवकांनी हाती घेतली आहे.
संवेदनशील असलेला दोडामार्ग तालुका आता असंवेदनशीलतेकडे झुकू लागला आहे. आताची तरुण पिढी अमली पदार्थाच्या नशेची शौकीन होत आहे. तालुक्यात अमली पदार्थ (दारू तसेच ड्रग्ज, गांजा) यांचे सेवन करणाऱ्या युवा पिढीतील सांख्या वाढत आहे. जिल्ह्यातील आणि तालुक्यातील युवा वर्गाला ड्रग्ज आणि गांजारुपी पाशाने विळखा घातला आहे. या विळख्यातून युवा वर्गाला सोडवण्यासाठी आई- वडिलांनी कठोर पाऊले उचलणे आवश्यक आहे. आपल्या मुलगा काय करतो, घरात कधी येतो, त्याची मैत्री कोणासोबत आहे, त्याच्या वागण्या-बोलण्यात कसा बदल होत आहे. याकडे कटाकक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. मुलाशी दर दिवशी आपण संवाद साधने गरजेचे आहे. आई-वडिलांना वृद्धापकाळ आपल्या मुलाच्या भरवशावर आपले पुढील आयुष्य काढायचे असते. मुले ही वृद्धापकाळात आपला आधार असतात. आणि आयुष्याच्या ऐन वळणावर लक्ष दिले नाही तर, व्यसनाधीन मुलाचे आयुष डोळ्यादेखत बरबाद होताना पाहण्याची नामुष्की ओढवते. ह्या पेक्षा दुसरे दुर्भाग्य नाही. त्यामुळे योग्य वेळी आपल्या मुलांच्या हालचालींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशी जनजागृती करणारी एक लघु चित्रफित दोडामार्ग तालुक्यातील युवकांनी नुकतीची प्रसारित केली आहे.
नशेपासुन राहा दूर राहण्याचे युवा पिढिला आवाहन करण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील ‘स्वामी प्रोडक्शन सिंधुदुर्ग” या संस्थेने पुढाकार घेत ही लघु चित्रफित बनविली आहे. या चित्रपटाचे निर्माता हेल्पलाईन ग्रुपचे अध्यक्ष वैभव इनामदार, झरेबांबरच्या माजी सरपंचा स्नेहा गवस, दिग्दर्शन करण शेटकर, व्यवस्थापक विकास तर्फे, गायक राजेश नाईक, आणि इतर कलाकार यांनी एकत्र येत ही संकल्पना राबविली आहे. या लघु चित्रपट निर्मिती मागचा त्यांचा एकच उद्देश आहे. की, आपल्या जिल्ह्यात आणि तालुक्यात ड्रग्ज, गांजा या सारख्या नशेली व्यसनाकडे युवापिढी 50 ते 60 टक्के झुकली आहे. किबहुना त्यापेक्षा जास्त युवावर्ग चुकीची मैत्री, क्षणिक सुखासाठी केलेला चुकीच्या प्रयत्नामुळे व्यसनांधीन झाले आहेत. आज ते व्यसनाशिवाय ते जगू शकत नाही अशी काहींची अवस्था झालेली आहे. हे व्यसन असे आहे की, अमली पदार्थाच्या नशेतील व्यक्ती खून, चोरी, वेळ पडल्यास वेसन पुरतेतेसाठी जन्मदात्या आपल्या आई-वडील यांचा सुद्धा खून करण्यासाठी हे वेसन प्रवृत्त करते. ह्याची आपल्या ग्रामीण भागातील समाज्यात जनजागृती व्हावी यासाठी हा लघु चित्रपट निर्माण करण्यात आला आहे. दोडामार्ग, कुडासे, कळणे, साटेली-भेडशी, पिकुळे शाळा आणि महाविद्यालय विध्यार्थी वर्गाला आतापर्यंत ही फिल्म दाखवण्यात आली आहे. तालुक्यातील इतर उर्वरित शाळेतही हा चित्रपट दाखवून चुकीच्या सवयी, चुकीची मैत्री, यामुळे जीवनावर होणारे परिणाम, होणारी हानी मुलांच्या लक्षात आणून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.