कुडाळमध्ये रंगात तरुणाई न्हाऊन निघाली आहे.  Pudhari Photo
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात शिमगोत्सवाची धूम..! कुडाळात रंगात आबालवृद्ध बेभान

Sindhudurg Holi | Kudal Holi celebration | रंगपंचमीत सर्वपक्षीयांची एकी, ठिकठिकाणी उत्साह

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : तळकोकणासह सिंधुदुर्ग जिल्हाभरात सध्या शिमगोत्सवाची जोरदार धूम सुरू आहे. कुडाळ येथे शुक्रवारी ( दि.१४) शहरवासियांनी सप्तरंगांची उधळण करीत मोठ्या जल्लोषात रंगपंचमीचा आनंद लुटला. यावेळी कुडाळ शहरातील दीड दिवसाच्या शिमगोत्सवाची धूलिवंदनाने सांगता झाली. दरम्यान, शहरातील जिजामाता चौक येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सप्तरंगांची उधळण करीत धुळवड साजरी केली. शहरासह ग्रामीण भागातही ठिकठिकाणी रंगपंचमीचा उत्साह सुरू होता. तालुक्याच्या ग्रामीण भागात गावागावात शिमगोत्सवाची जोरात धूम सुरू आहे. (Sindhudurg Holi)

गुरूवार पासून सर्वत्र मोठ्या उत्साहात शिमगोत्सवाला प्रारंभ झाला. शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी होळीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दुस-या दिवशी शुक्रवारी ठिकठिकाणी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कुडाळ शहरात ठिकठिकाणी डिजेच्या तालावर थिरकत सप्तरंगांची उधळण करीत शहरवासियांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. यावेळी तरूणाईसह अबालवृध्द रंगपंचमीच्या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. शहरात दुपारपर्यंत रंगपंचमीचा मोठा उत्साह सुरू होता. यावेळी शहरातील जिजामाता चौक व बाजारपेठेत येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत रंगपंचमी साजरी केली. दरम्यान, उद्या शनिवारी रात्री नेरूर सायचे टेंब येथील प्रसिद्ध मांड उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविधांगी चित्ररथ देखावे आकर्षण ठरणार आहेत.

कुडाळात होळीनंतर दुसऱ्याच दिवशी रंगपंचमी

विविध रंगानी शुक्रवारी कुडाळ नगरी रंगात न्हाऊन गेली. सकाळ पासुनच लहान मुलांपासुन तरुणांमध्ये रंगाचा मदहोश जणुकाही संचारल्याचा भास होत होता.चौका-चौकात डीजेवरील सिनेमातील गाण्याच्या ठेक्यावर तरुणाई थिरकत होती. रंगपंचमी म्हणजे सर्वच रंगासाठी आणि आपल्यासाठीच आहे. अशा धुंदित तरुण - तरुणींचे ग्रुप मोटार सायकल वरून सुसाट रपेट करताना दिसत होते. मात्र, रंगाच्या-रंगात बेफाम झालेल्या कुडाळ नगरीत बाहेरून येणाऱ्यांची चाहूल दिसत नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत होते. कुडाळ नगरीची होळी नंतर दुसऱ्याच दिवशी रंगपंचमी असल्याने या रंगपंचमीची जिल्हयात चर्चा असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT