Sindhudurg Rain (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Sindhudurg Rainfall | जिल्ह्यात सरासरी 2,165 मि.मी. पाऊस

District Rainfall Data | सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यापासून सातत्याने पडणार्‍या पावसाचा जोर जुलैअखेर पर्यंत कायम आहे.

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यापासून सातत्याने पडणार्‍या पावसाचा जोर जुलैअखेर पर्यंत कायम आहे. बुधवार 30 जुलैअखेर पर्यंत जिल्ह्यात सरासरी 2165 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे हवामान खात्याने यलो अलर्ट आणि मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशाराही दिल्यामुळे, जिल्ह्यात पडणार्‍या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.

सिंधुदुर्ग सह कोकणात केले दोन महिने सतत पाऊस पडत आहे. काही ठराविक दिवस वगळता पावसाचा जोर कायम असून यावर्षी 21 मे पासूनच पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकर्‍याची भातशेतीची कामेही खोळंबली दरम्यान काजू आंबा लागवड व लागवड योग्य पिकांना खत घालण्याची कामेही खोळंबली आहेत. कोकणसह राज्यातच पावसाने थैमान घातले असून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे.

गेल्या काही दिवसा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. रात्रीच्या कालावधीत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे काहीसा हवेत वातावरण गारवा निर्माण झाला आहे. ऊन आणि पाऊस यात तापसरी व अन्य साथीनेही डोके वर काढले आहे. दूषित पाण्यामुळे अनेक अतिसार व अन्य आजार बळावले आहेत. मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे भात पेरण्याही उशिरा झाल्या त्यामुळे यावर्षी शेती पिकही प्रमाण घटले असल्याचे दिसून येत आहे.

यावर्षी मे महिन्यामध्ये 538.4 मि मी पाऊस पडला होता. त्यात सर्वात जास्त सावंतवाडी तालुक्यात पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जून महिन्यामध्ये 666.7 मी मी सरासरी पाऊस पडला. त्यामध्येही सावंतवाडी तालुक्याने अधिक टक्केवारी गाठली आहे. तर 1 जुलैपासून आतापर्यंत959.4 मी मी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सिंधुदुर्गात पावसाचा जोर अधुनमधून कायम असून हवामान खात्याने मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशाराही दिला आहे. गेल्या आठवडाभर अधून मधून पडणार्‍या पावसामुळे काही अशी जनजीवन विस्कळीत झाले होते. हवामान खात्याने मुसळधार पर्जन्यवृष्टी आणि येलो अलर्ट ऑरेज असा इशारा दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

21 मे ते 30 जुलै या कालावधीपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा 2164.4 मिमी पाऊस पडला आहे. गेल्या 24 तासात 98मिमी नेहमी पाऊस झाला असून याचा परिणाम भुईमूग, उडीद, नाचणी यासह नगदी पिकांवर परिणाम झाला आहे. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे माकडांसह अन्य जनावरांच्या मुळे शेतकरी रस्ता झाला असून यावर्षी पावसामुळेही शेतकर्‍यांचे पीक वाया गेले आहे. अजूनही पावसाच्या या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT