पोलिस निरीक्षकांना जाब विचारताना माजी आमदार वैभव नाईक व परशुराम उपरकर  Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg News |दाभोली येथील मारहाण प्रकरणी वैभव नाईक, परशुराम उपरकर यांची वेंगुर्ले पोलीस स्थानकात धडक

न्याय मिळेपर्यंत शिरोडकर कुंटुंबाच्या पाठीशी राहणार

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथे काही दिवसापूर्वी झालेल्या मारहाण प्रकरणी आज माजी आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये धडक देत पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी न्याय मिळेपर्यंत शिवसेना शिरोडकर कुटुंबियांच्या पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाकरे शिवसेनेच्या पाठिंब्यानंतर कुटुंबियांची तक्रार दाखल झाल्यानंतर वेंगुर्ले पोलीस स्थानकात संशयीतांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावडेवाडी येथील स्थानिक कुटुंबीयांना परप्रांतीयांकडून मारहाण प्रकरणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच याबाबत वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती. याबाबत संबंधितांची तक्रार नोंदवण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी आज वेंगुर्ले पोलीस स्थानकात धडक दिली व पोलिस निरीक्षक यांना याचा जाब विचारला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक व संजय गावडे, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, माजी नरसेवक तुषार सापळे, दाभोली सरपंच उदय गोवेकर उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, विवेक परब,अमित राणे, शैलेश परुळेकर,गजानन गोलतकर, संतोष शिरोडकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT