पेंडूर : उपसरपंच समीक्षा तांडेल यांचे अभिनंदन करताना सरपंच संतोष गावडे व सुजाता पडवळ  Pudhari Photo
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग: पेंडूरच्या उपसरपंचपदी भाजपच्या समीक्षा तांडेल बिनविरोध

Sindhudurg News | महादेव नाईक यांचा राजीनामा

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले, पुढारी वृत्तसेवा : वेंगुर्ले तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या समीक्षा सत्यवान तांडेल यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच संतोष गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात ही निवड झाली. ग्रामपंचायत अधिकारी सोमा राऊळ यांनी या सभेचे कामकाज पाहिले. उपसरपंच महादेव विजय नाईक यांनी ११ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवड प्रक्रिया पार पडली. (Sindhudurg News)

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद गावडे, प्रणिता सावंत, सुलोचना परब, दीपक कवठणकर, महादेव नाईक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष उमेश सावंत, ग्रामस्थ सत्यवान तांडेल, विठ्ठल तांडेल, शंकर तांडेल, उत्तम सावंत, दादा तांडेल, निलेश गावडे, कृष्णा तांडेल, महेश गावडे, नंदकिशोर चव्हाण, ग्रा. प.कर्मचारी वैशाली नाईक, घन:श्याम नाईक आदी उपस्थित होते. निवडीनंतर भाजप महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ यांनी नवनिर्वाचित उपसरपंच समीक्षा तांडेल यांचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT