सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात मृग नक्षत्रावर भात पेरणीला सुरुवात

अविनाश सुतार

नांदगाव: पुढारी वृत्तसेवा: मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.  जिल्ह्यातील  प्रमुख पीक मानले जाणाऱ्या भात पेरणीला पारंपरिक व यांत्रिक पध्दतीने सुरुवात झाली आहे.

मृग नक्षत्र निघाले की शेतकरी  भात पेरणीला सुरुवात करतात. आता यंत्र सामुग्रीच्या माध्यमातून ट्रॅक्टरने शेती नांगरून भात पेरणी केली जात आहे. कणकवली तालुक्यातील नांदगाव या ठिकाणी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती नांगरताना व भात पेरणी करताना बळीराजा दिसत आहे. नांगरणी तसेच भात पेरणीत  बळीराजा सध्या व्यस्त असल्याचे कोकणात सर्वत्र पहावयास मिळणार आहे.

गुरुवारी रात्री पाऊस पडला तरी शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण व अधूनमधून हलक्या सरी पडत होत्या. यामुळे आजपासून अनेक भागात भात पेरणीला वेग येणार आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT