ओरोस, पुढारी वृत्तसेवा: मुंबई - गोवा महामार्गावरील ओरोस येथे वाहतुकीस अडथळा ठेरणारी व धोकादायक बेकायदेशीर इमारत गुरुवारी (दि.१३) जमीन दोस्त करण्यात आली. ही कारवाई महामार्ग प्राधिकरणाने पोलीस बंदोबस्तात केली.
ओरोस बुद्रुक येथे अब्दुल हमीद सुबराणी यांनी हे बेकायदेशीर बांधकाम केले होते. येथे त्यांचा गादी कारखाना व फर्निचर व्यवसाय सुरू होता. त्यामुळे थेट महामार्गावरच वाहने पार्किंग केली जात होती. त्यामुळे वळणावरील हे क्षेत्र धोकादायक बनले होते. यापूर्वी महामार्गावर अनेक अपघात झाले होते. याबाबतच्या तक्रारी महामार्ग प्राधिकरण व तहसीलदार यांच्याकडे आल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.