करूळ घाटात दरड कोसळली 
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : करूळ घाटात दरड कोसळली; संरक्षक कठडेही तुटले

डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर

पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी : गेले काही दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे शुक्रवारी करूळ घाटात मोठी दरड रस्त्यावर कोसळली. त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला आहे. डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर पडल्याने नव्याने बांधलेले संरक्षक कठडे तुटले आहेत. या मार्गावरील वाहतूक गेले सहा महिने बंद आहे.

दरम्यान, संबंधित यंत्रणेकडून दरडींचा ढीग हटवण्याचे काम सुरू आहे. मात्र, संरक्षक कठडे तुटल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. करूळ घाट रस्ता रुंदीकरणामुळे गेले काही महिने बंद आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनाकडून करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीने ही घाट मार्गाला मोठा दणका दिला आहे. यापूर्वी संरक्षक भिंत दरीत कोसळली होती. दरम्यान, ठेकेदाराच्या निकृष्ट कामांबाबत तसेच संबंधित यंत्रणेने कामाकडे केलेले दुर्लक्ष यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. पुन्हा एकदा दरड कोसळून संरक्षक कठडे तुटल्याने घाटमार्गाच्या निकृष्ट कामांबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT