खारेपाटण : येथील शिबिरात मार्गदर्शन करताना मान्यवर.  (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Sindhudurg Self-Employment News| स्वयंरोजगारातून उगवेल जीवनाची नवी पहाट, नोकरीची पाहू नका वाट!

Unemployed Youth Motivation | खारेपाटण सरपंचांचा बेरोजगार युवक-युवतींना आत्मनिर्भरतेचा कानमंत्र

पुढारी वृत्तसेवा

खारेपाटण : अनुसूचित जाती प्रवर्गातील गरजवंत बेरोजगार युवक-युवती व महिलांनी सरकारी नोकरीची वाट न पाहता स्वयंरोजगारातून आपली व कुटुंबाची प्रगती साधावी, असे आवाहन खारेपाटण सरपंच सौ. प्राची ईसवलकर यांनी केले.

संघमित्रा महिला मंडळ खारेपाटणच्या अध्यक्ष सौ. संकीता पाटणकर यांचे अध्यक्षतेखाली बुद्धविहार, पंचशील नगर खारेपाटण येथे जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र शासन उद्योजकता विकास केंद्र यांच्या वतीने बेरोजगार युवक युवती व महिलांसाठी एकदिवसीय स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यशाळा झाली.

या कार्यशाळेचा शुभारंभ सरपंच सौ. प्राची ईसवलकर यांचे हस्ते झाला. जिल्हा उद्योग केंद्र प्रकल्प अधिकारी राजेश कांदळगावकर, व्यवस्थापक श्री. शिंगटे, समन्वयक श्रीम. साखरकर, बँकिंग आर्थिक साक्षरता प्रोजेक्टचे सुभाष राणे, शिक्षिका श्रीम. काझी, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, सौ. आस्था पाटणकर, सागर पोमेडकर आदी उपस्थित होते. प्रकल्प अधिकारी राजेश कांदळगावकर यांनी योजनांची माहिती दिली. व्यवस्थापक श्री. शिंगटे, सुभाष राणे यांनी योजनांची माहिती दिली. आभार संतोष पाटणकर यांनी मानले.

शासनाच्या योजना तुमच्या दारात आल्या आहेत, आता फक्त गरज आहे ती तुमची इच्छाशक्ती आणि धाडसाची. स्वयंरोजगारातून केवळ तुमचीच नव्हे, तर तुमच्या कुटुंबाचीही प्रगती साधा.
सौ. प्राची ईसवलकर, खारेपाटण सरपंच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT