कवठी खून प्रकरणातील संशयित सख्ख्या भावांना न्यायालयात नेताना Pudhari Photo
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग: कवठी खून प्रकरणातील संशयित सख्ख्या भावांना ४ दिवसांची पोलीस कोठडी

Sindhudurg Murder Case | कुडाळ न्यायालयाने आज सुनावली कोठडी

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ: पुढारी वृत्तसेवा: कवठी अन्नशांतवाडीत येथील संदीप करलकर खून प्रकरणातील रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर (वय ४०) व शैलेश दत्ताराम करलकर (वय ४३) या दोन सख्या भावांना संशयित आरोपी म्हणून निवती पोलिसांनी अटक केली. दोन्ही संशयितांना सोमवारी (दि.३) कुडाळ येथील न्यायालयात हजर केले. सहदिवाणी न्यायाधीश पी. आर. ढोरे यांनी संशयितांना गुरुवारी (दि. ६) पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. (Sindhudurg Murder Case)

संदीप करलकर जबर मारहाणीत मृत झाला होता. याबाबतची फिर्याद संदीप करलकर याचा मुंबईस्थित भाऊ संतोष करलकर याने निवती पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार निवती पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. कामगार श्यामसुंदर वाडयेकर याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर रविवारी सायंकाळी उशिरा निवती पोलीस ठाण्याचे अधिकारी भीमसेन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रामचंद्र करलकर व शैलेश करलकर या दोन संशयित बंधूंना अटक केली होती. (Sindhudurg Murder Case)

संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडी - अॅड. परब

यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. मनिषा परब यांनी बाजू मांडली. खुनाच्या घटनेनंतर आरोपी दोन व तीन (दादा करलकर व शैलेश करलकर) हे फरार होते.रविवारी त्यांना अटक केली.त्याच्याकडुन अधिक माहिती घेणे आवश्यक आहे.या प्रकरणात त्याच्या सोबत कोण-कोण होते? घटनेदरम्यान त्यांनी कोणते कपडे परिधान केले होते? तसेच आतापर्यंत त्यांनी पोलिसांना कोणतेही सहकार्य केले नाही.म्हणून या दोन्ही संशयित आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळावी, अशी पोलिसांची मागणी आहे. असे अॅड. परब यांनी न्यायालयाकडे विनंती केली.

संशयितांना पोलीस कोठडीची आवश्यकता नाही- अॅड. देसाई

संशयितांच्या वतीने अॅड. गौरी देसाई यांनी बाजू मांडली. या गुन्हातील संशयित आरोपी अटकेत आहेत. या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. याउलट संशयित आरोपी रामचंद्र करलकर व शैलेश करलकर यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची नाही. यातील एका संशयिताची पत्नी सरपंच आहे. दोन्ही संशयितांना पोलिस कोठडीची आवश्यकता नाही, असे अॅड. देसाई यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी कोर्टासमोर आपली बाजू भक्कम पणे मांडली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक नितीन पाटील, पोलीस हवालदार आशिष केळकर, सचिन सोनसुरकर, पोलीस अंमलदार नितीन शेडगे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT