करूळ घाटातील धोकादायक दरडी काढण्यास सुरूवात  Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Karul Ghat Landslide | करूळ घाटातील धोकादायक दरडी काढण्यास सुरूवात : छत्रपती संभाजीनगर येथील कंपनीकडून काम सुरू

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तज्ज्ञांचे पथकाच्या पाहणीनंतर वाहतूक सुरू करण्याचा घेणार निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Landslide Prevention in Karul Ghat

वैभववाडी : करूळ घाटात धोकादायक असलेल्या तडा गेलेल्या दरडी काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामात पारंगत असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील एसएसपीएल कंपनीला पाचारण केले आहे. या कंपनीने आज (दि.६) सकाळपासून कुशल मनुष्यबळ वापरून दरड काढण्यास सुरुवात केली आहे. यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तज्ज्ञांचे पथक पाहणी करून वाहतूक सुरू करण्याबाबतचा निर्णय घेणार आहेत. याआधी 12 सप्टेंबर पर्यंत वाहतूक बंद करण्याचा घेतलेला निर्णय पुढे आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

करूळ घाटात गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गगनबावड्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या यु आकाराच्या वळणात महाकाय दरड कोसळली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यंत्रणे कडून गुरुवारी सकाळपासूनच ही दरड काढण्यासाठी दोन एसीबी व दगड फोडणारे मशीन या ठिकाणी लावण्यात आले होते. मात्र ही पडलेली दरड बाजूला काढत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडीला तडे गेल्यामुळे ती पडण्याचा धोका कायम होता.तही धोकादायक दरडी काढण्यासाठी पाच सहा दिवस अवधी अपेक्षित आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना कळवून दिनांक 12 सप्टेंबर पर्यंत घाटमार्गातील वाहतूक बंद करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सुरक्षेतेच्या कारणास्तव घाट मार्गातील वाहतूक बंद करण्यात बाबत निर्णय घेतला आहे. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तज्ञ कमिटीने शुक्रवारी संपूर्ण करुळ घाटाची पाहणी केली. संपूर्ण घाटाची पाहणी केल्यानंतर दरडी कोसळण्याची धोका असलेली पाच ठिकाणे निश्चित केली आहेत. या तडे गेलेल्या दरडी या उंच डोंगरावर असल्यामुळे त्या मशीनच्या सहाय्याने काढणे काढणे शक्य नाही. त्यामुळे या दरडी काढण्यासाठी कुशल कामगार वापरून काम करणे आवश्यक आहे. तडे गेलेल्या धोकादायक दरडी काढण्यासाठी या कामातील पारंगत असलेल्या औरंगाबाद येथील कंपनीला पाचरण करण्यात आले आले आहे. या कंपनीला आसाम,जम्मू काश्मीर अशा ठिकाणी काम करण्याचा अनुभव आहे.

या कंपनीकडून आज सकाळपासून गुरुवारी पडलेल्या दरडीच्या ठिकाणी तडे गेलेल्या दरडी मनुष्यबळाच्या सहाय्याने काढण्यात येत आहेत. सुमारे 50 ते 60 फूट उंचीवर रस्सीच्या सहाय्याने जाऊन हे कामगार तडे गेलेला दरडीचा भाग पहारीच्या साह्याने काढत आहेत.हे काम अतिशय जोखमीचे असल्यामुळे त्याला वेळ लागण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा तज्ज्ञ टीम पाहणी करून वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेणार आहे.

22 जानेवारी 24 पासून सुमारे 14 महिने  करूळ घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करून या संपूर्ण मार्गाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण कॉंक्रिटीकरण संरक्षण भिंती, मोरया आधार भिंती अशी कामे करण्यात आली आहेत. या कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या पहिल्याच पावसात नवीन काँक्रीटीकरण च्या रस्त्यासह संरक्षण भिंत कोसळल्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात होती. रस्त्याचे रुंदीकरण करतांना मशीनच्या साहाय्याने दरडी काढण्यात आल्या. त्यामुळे ढसळेलेल्या दरडी कोसळण्याचे सत्र गेल्यावर्षी पासून सुरु आहे.गेल्यावर्षी पावसाळ्यात मोठया प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. मात्र घाटातील वाहतूक बंद असल्यामुळे त्याची फारशी चर्चा झाली नाही.

उशिरा सुचलेले शहाणपण

कोसळणाऱ्या दरडी चा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता दरडी कोसळल्यानंतर तज्ज्ञांच्या टीमला पाचरण केले. खरंतर या घाट मार्गाच्या नूतनीकरणाच्या व रुंदीकरणाच्या वेळी तज्ज्ञांकडून अहवाल घेणे अपेक्षित होते. मात्र, याकडे डोळेझाक करत काम रेटण्यात आले. आता दरडी कोसळायला लागल्यानंतर तज्ज्ञ टीमला पाचारण करणे हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT